शहरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय.

112

भद्रावती :- भद्रावती चे शहरात रूपांतर झाले आले तरी आजही मोठ्या प्रमाणात शहरात दुग्ध व्यवसाय व शेती व्यवसायाकरिता बऱ्याच प्रमाणात शहरात गुरांची संख्या बघावंयास मिळते.नागरिकांकडे गुरांना बांधावयास पर्याप्त जागा नसल्याने काही लोक आपली गुरे उघड्यावर बांधतात तर काही शहरात मोकाट असतात. अशाचाच फायदा घेत मागील काही दिवसांपासून शहरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून मोकाट गुरांन सोबतच मानवरहित गोठ्याबाहेरील तथा उघड्यावर बांधलेली गुरे या टोळी द्वारे चोरली जात असल्याचे प्रकार उघळकीस आले आहेत.

भद्रावती सोबतच शहराच्या आजू बाजूला बरीच गावे आहेत जिथे शेती व दुग्ध व्यवसाय केला जातो.त्या मुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुरांची संख्या आहे. चारा व रोजदारांची कमतरता लक्ष्यात घेता बऱ्याचदा जनावरे मोकाट सोडली जातात.या संधी चा फायदा घेवून शहराबाहेरील जनावरे दिवसा तर शहरातील जनावरे रात्रीला चोरीला जात आल्याचे प्रकार उघळकीस आले आहेत.

शहरालगत आलेल्या चेक बरांज परिसरातील जंगलात गुप्त कोंडवाळा असल्याचे बोलले जात आहे.जिथे ही चोरलेली जनावरे आधी जमा केली जातात व नंतर अंधाराचा फायदाघेत या जनवारांची तस्करी केली जात आल्याचीही चर्चा परिसरात आहे.

या प्रकरणांबाबतच्या तक्रारी वारंवार नागरिकांनी पोलीस स्टेशन तथा नगरपालिकेला केल्या आहेत. परंतु अजून पर्यंत या चोरट्याना आळा घालण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. परिणामी परिसरातील जनावरे चोरी होत आल्याच्या घटना सुरूच आहेत सदर प्रकरणाकळे प्रशासना सोबतच लोक प्रतिनिधिनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.