
भद्रावती= महाराष्ट्र शासन व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे निर्देशानुसार विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे, ” राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन २४ सप्टेंबर” चे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर, ते ०२ ऑक्टोबर, २०२५ हा स्वच्छता हीच सेवा पंधरवाडा प्रा. डॉ. जयवंत काकडे, इतिहास विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्या नेतृत्वात संपन्न झाला.
त्या अंतर्गत विद्यार्थी प्रिय शिक्षकाचा सत्कार व निबंध सादरीकरण, सरदार पटेल यांचे राष्ट्रीय एकात्मतेतील योगदान या विषयावर व्याख्यान, एनएसएस स्थापना दिवस या अंतर्गत परिसर स्वच्छता, कविता वाचन व स्वयंसेवकांचे मनोगत, ‘चला भेटूया एमपीएससी पास विद्यार्थ्याला’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम, राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती व पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम, जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या जवळील वार्डात प्लास्टिक निर्मूलन व वृक्षदिंडीचे आयोजन तसेच पथनाट्य, विश्व पर्यटन दिवस च्या निमित्ताने गडकिल्ल्यांची चित्रफित व शहीद भगतसिंह यांच्या जीवन कार्याचा परिचय, विश्व हृदय दिवस निमित्ताने ‘मानवी आरोग्य ‘ या विषयावर व्याख्यान, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती असे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सदर पंधरवडा विविध कार्यक्रमांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एन. जी. उमाटे, उपप्राचार्य, डॉ. सुधीर आष्टुनकर यांचे मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राध्यापक वृद्ध व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.