निप्पोन प्रकल्पग्रस्त शासनाच्या उदासीनतेमुळे झाले त्रस्त

115

निप्पोन प्रकल्पग्रस्त शासनाच्या उदासीनतेमुळे झाले त्रस्त

भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील विंजासन गवराळा ढोरवासा चिरादेवी चारगाव पिपरी तेलवासा परिसरातील बाराशे हेक्टर जमीन १९९४ साली मोठा गवगवा करीत अत्यन्त कवडीमोल भावात निप्पोन प्रोजेक्ट करिता अधिग्रहित करण्यात आली. मात्र आजतागायत कोणताही उद्योग न उभारल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसण्याचा प्रकार पूर्वीच्या व आताच्या सरकारने चालविलेला आहे. अश्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने दि.19 फेब्रुवारी रोज रविवारला ढोरवासा रोड वरील आवारी सिमेंट प्लांट येथे प्रसिद्ध विधितज्ञ पुरुषोत्तम सातपुते यांचे कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी तत्कालीन निप्पोन प्रकल्पाच्या आमिषाने परिसरातील शेतकरी अक्षरशः बरबाद झालेला आहे म्हणून न्यायालयिन लढा व संघर्ष करण्यासाठी प्रकल्पग्रस्तानी संघटीत होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकल्पग्रस्त आक्रोश सभेचे आयोजन वासुदेव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मधुकर सावनकर, सुधीर सातपुते, दामोधर भादेकर,बबन डोये लिमेश माणुसमारे, यांनी समयोचित विचार व्यक्त केले.याप्रसंगी परिसरातील सर्व भूमिहीन, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त शेकडोंच्या संख्येत उपस्थित होते.