संतोषसिन्ह रावत यांच्या आंदोलनाला अखेर प्रशासन झुकले

21

मुल : यावर्षीच्या २०२४ च्या चालू खरीप हंगामाची पूर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली असून मागील पंधरा दिवसांपूर्वीच पावसाळा सुरू होताच रोवण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले तर सर्वसाधारण शेतकरी धान आवत्या टाकले आहेत. परंतु हंगाम सुरु झाल्यापासून तर आजपर्यंत मुल सावली, काही गावे पोभूर्णा तालुक्यातील असल्याने खरीप धान पिकाची पेरणी केली तेव्हा पासून नसल्याने पऱ्हे व आवत्या वाळून जात असल्याने पीक कसे होणार या विवंचनेत शेतकरी होता. आणि तलावाचे पाणी सोडायला लावा यासाठी रावत यांचेकडे मागणी लाऊन धरली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पाण्याची बोंब लक्षात घेऊन आंदोलन करण्याचे ठरऊन दिनांक १६ जुलै २०२४ रोजी गोसेखुर्द आसोलामेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री.पिदुरकर साहेब यांना सावली येथे जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा केली व निवेदन दिले. चर्चेत जूनसुरला, वीरई, फिस्कूटी नहराचे काम, गोवर्धन नांदगाव रखडलेले काम, खेडी साजातील शेतकऱ्यांना पाईपलाईन व व्हालचे काम ठेकेदारांकडून तात्काळ करुन द्यावे, ठेकेदार काम करण्यास असमर्थ असेल तर त्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून दुसऱ्याला काम देण्याची व कारवाई करण्याची आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, याची जाणीव सुद्धा संतोष सिंहरावत यांनी कार्यकारी अभियंता पिदूरकर यांना करुन देत, पाणी नाही दिले तर हजोरो शेतकऱ्यांनाआणून तुमच्याकार्यालयासमोर बसल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देखील शेतकऱ्यांसमोर दिला. तालुका काँग्रेसच्या मुलच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात निवेदन देताना सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनूले,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, राजू पाटील मारकवार, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, संचालक सुमित आरेकर, गणेश खोब्रागडे, योगेश शेरकी, जालिंदर बांगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, अनिल निकेसर, प्रदीप कामडे, संजय गिरडकर, मस्के, यांचेसह राजगड, फिस्कुटी, वीरई, चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भूज), बेंबाळ, नांदगाव, गोवर्धन, बोंडाळा,चक दुगाळा , येरगाव, चक् बेंबाळ, बोरचांदली, चीचाला,हळदी, येरगाव, खेडी, येथील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

आजच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले. कार्यकारी अभियंता पिदुरकर

खरीप धान पिकांना मिळत नसल्याची तक्रार निवेदणासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व अनेक शेतकरी बांधवांनी केले असता आजच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले. कारण आसोला मेंढा तलावात फक्त २८ टक्के पाणी शिल्लक असल्याने गोसेखुर्दचे पाणी सोडल्याचे सांगितले.परंतु टेल पर्यांतच्या गावांना पाणी पोहचण्यासाठी तीन दिवस लागणार असेही पिदूरकर यांनी निवेदन कर्त्यांना सांगितले.