४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ‘भगवा सप्ताह

17

वरोरा :

दि. ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ हा ‘भगवा सप्ताह’ म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जनता जनार्दना सोबत संपर्क करुन त्यांच्या समस्या ऐकुन त्या तातडीने निकाली काढुन भगवा सप्ताह साजरा करावा असे आदेश पदाधिकारी व शिवसैनिकांना दिले आहेत. पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे व पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे मार्गदर्शनात विविध जनसेवेचे उपक्रमांसह सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. दि.४ ॲागष्ट ते ११ ॲागष्ट २०२४ या दरम्यान भगवा सप्ताहात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व विंगचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन वरोरा-भद्रावती तथा राजुरा विधानसभा जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

या सप्ताहात “घर तेथे शिवसैनिक व गाव तेथे शिवसेनेची शाखा” ही संकल्पना राबवीण्यात येणार आहे. भगवा सप्ताह निमित्त जनसेवेच्या विविध योजना सुरु करण्यात येणार आहे.

मंगळवार दि. २३ जुलै २०२४ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत भगव्या सप्ताह बाबत सूचना केलेल्या होत्या.

वरोरा-भद्रावती तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातून किमान ५०,००० सदस्य नोंदणी करुन घेण्यात येणार आहेत. भगव्या सप्ताहानिमित्त विधानसभा क्षेत्राचे विधानसभा संपर्कप्रमुख प्रत्यक्ष विधानसभा क्षेत्रात भेट देणार आहेत. सोबतच विधानसभा क्षेत्रातील नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने मतदार यादी तपासून त्यातील त्रुटी दुरुस्त कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्य काळात राज्याच्या जनतेला दोनदा दिलेली कर्ज माफी, शेती मालाला दिलेला भाव, विविध लोकहितार्थ राबविल्या गेलेल्या योजना व घेतलेले निर्णय, कोरोना काळातील महाभयंकर सकंटावर केलेली नियोजनबध्द मात, या सर्व लोकोपयोगी कार्यांना उजाळा देण्यात येणार आहे.

तसेच घटनाबाह्य सरकारकडुन राज्यात सुरु असलेली हुकुमशाही जाती पातीच्या नावावरील भेदभाव व आरक्षणाच्या नावाखाली जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे, याविषयी या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने घरोघरी जावुन शिवसैनिक व पदाधिकारी व्दारा जनतेसमोर वाचा फोडुन या ढोंगी सरकारचा फडदाफाश करुन जनतेला जागृत करण्यात येणार आहे.