भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांची सोडवणूक करा* : *शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मागणी

24

भद्रावती : स्थानिक नगरपालिका कार्यक्षेत्रातील मार्ग, नाल्या आणि स्वच्छता या समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी. अशी मागणी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात, तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्या संयोजनात आणि शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांचा नेतृत्वात करण्यात आली आहे.
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या तालुका कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रकात असे नमुद करण्यात आले की, सध्यस्थितीत भद्रावती शहराची लोकसंख्या ६५०६५ इतकी आहे. शहरात २७ वार्ड व १३ प्रभाग आहे. शहरातील अनेक मार्ग ठिकठिकाणी ना दुरुस्त झाले आहे. यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते भांदक रेल्वे स्टेशन, जुना बसस्टॉप ते ग्रामीण रूग्नालय – श्रीराम नगर, गोळीबार चौक ते हनुमाननगर -केसुर्ली, जुना बसस्टॉप ते मल्लार स्मशान भुमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी नगर आणि शाई चौक ते सुमठाणा ह्या मार्गांचा समावेश आहे. भद्रनाग मंदिर ते विजासन ह्या मार्गावर काही ठिकाणी पेवर बॉक्स लावणे बाकी आहे. सोबतच काही वार्डातील अंतर्गत मार्गाची सुध्दा दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
काही वार्डातील नाल्या व चेंबरची तुट फुट झाली आहे. ह्या नाल्यांची वेळोवेळी साफसफाई करण्यात यावी. काही वार्डात कचरा गोळा करण्याकरीता घंटागाडया नियमीत फिरत नाही. सध्या पाऊसाळयाचे दिवस असल्याने जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने शहरातील नादुरुस्त मार्ग, नाल्या व चेंबर ची तात्काळ दुरुस्ती करावी. शहरातील स्वच्छता अभादित राहण्यासाठी सार्वजानिक नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात यावी. तसेच शहरात कचरा गोळा करणाऱ्या कचरा गाडया नियमित फिरविण्यात याव्या. अश्या मागण्या करण्यात आल्या आहे.