महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे गोंडवाना विद्यापीठावर धरणे आंदोलन

14

चंद्रपूर :

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ कार्यकारी मंडळाच्या दि. ७ जुलै २०२४ च्या ठरावानुसार, कुलगुरू कार्यालय, गडचिरोली येथे दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ ते ४ च्या कालावधी मध्ये प्राध्यापकांचे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर आंदोलन हे उच्च शिक्षण विभागातील उच्च अधिकारी यांनी केलेल्या अधिकाराचा गैरवापर व मनमानी कारभाराविरोधात असून, या अधिकाऱ्याविरोधात शासनाकडे कार्यवाहीची मागणी सदर आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सोबतच UGC च्या नियमाप्रमाणे ९०% प्राध्यापक भरती झाली पाहिजे, विद्यापीठात युजीसीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रलंबित मागण्याबाबत चर्चा आदी विषय घेवून आंदोलनाचे आयोजन असल्याची माहिती महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे कार्यकारी सदस्य व गोंडवाना विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. प्रवीण सुरेश जोगी यांनी माध्यमाना दिली आहे व समस्त प्राध्यापकवृंदांना धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे