देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा केंद्रीय बजेट : डॉ. अशोक जीवतोडे

2

चंद्रपूर :

आज (दि.१) ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे आर्थिक बजेट सादर केले. हा बजेट सर्वसमावेशक असून देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बजेट असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.

12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही. वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही. याचा फायदा आता नोकरदार, मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे, अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.

सोबतच गरीब, तरुण, अन्नदाता, नारी यांच्या विकासाकरिता विशेष लक्ष बजेट मधे देण्यात आले आहे.

दागिने, इलेक्ट्रोनिक वाहने, कॅन्सरचा उपचार, वैद्यकीय उपकरणे, एलईडी आणि एलसीडि टीव्ही, चामडीच्या वस्तु, लहान मुलांची खेळणी,भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे, विमा, मोबाईल फोन, आदी स्वस्त होणार आहेत. कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्यूटि हटवण्यात येणार आहे. ३६ जीवनावश्यक औषधे करामधून वगळली आहेत. या सर्वांचा सामान्यांना फायदा होणार आहे.अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञानासह , शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य, पर्यटन, उद्योग यांसह इतर क्षेत्रांसंबंधित महत्वाच्या घोषणा झाल्या आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे आवश्यकच होते. याशिवाय कृषी क्षेत्र, तसेच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या आहेत. स्टार्ट अप, सूक्ष्म व लघु उद्योग यातही मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले आहे