भद्रावती –
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या आदेशानुसार देशभरातील केंद्रीय कर्मचारी एक आठवडा विविध आंदोलनाने केंद्र सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधत आहे याचाच भाग म्हणून येथील आयुध निर्माणी म्युशन कंपनी भारतीय सुरक्षा कर्मचारी संघाच्या माध्यमातून हे आंदोलन राबविण्यात येत असल्याची माहिती प्रतीक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सदानंद गुप्ता यांनी पत्र परिषदेत दिली.
१९ ते २४ जून या आठवड्यात गेट मीटिंग, नारेबाजी, काळया फीती लावून नवीन पेन्शन योजनेचा निषेध या प्रकारातून हे आंदोलन केल्या जाईल नंतर दिनांक २४ जूनला या मागणीचे निवेदन आयुध निर्माणी महाप्रबंधकाच्या माध्यमातून पंतप्रधान यांना पाठविण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. एक जानेवारी २oo४ पासून लागू झालेल्या नवीन पेन्शन योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतरचे कर्मचाऱ्यांचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या अतिबिकट जाईल तसेच कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाले त्यांना शासकीय कर्मचारी म्हणूनच सेवानिवृत्ती द्या. या मागणी संदर्भात जानेवारी २०२३ मध्ये देशव्यापी आंदोलन केले त्यांची दखल घेऊन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी समिती गठन करून त्यावर विचार करू असे आश्वासन दिले होते. परंतु त्यावर अजून पावेतो कोणताही निर्णय घेतला नसल्याने परत आंदोलन उभारावे लागत असल्याची गुप्ता यांनी सांगितले. या आंदोलनाचा भाग म्हणून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे नवीन योजनेच्या विरोधात रॅली आणि धरणा देण्यात येईल तरी केंद्र सरकारचे लक्ष दिले नाही तर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत या सरकारला गंभीर परिणाम भोगावा लागेल. या पत्रपरशेत भारतीय मजदूर संघाच्या कंट्रक्शन संघाचे सदस्य मनोहर साळवे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष चिनी बालप्पा , महामंत्री सुशांत मिलमिले, प्रवीण तुरानकर, मनीष मत्ते, धर्मेंद्र पाल, सतीष नारनवरे, रविकांत दसोंदी, राकेश राऊत , राजकुमार नायक आदी उपस्थित होते