जीवाची बाजी लावून वाचविले पक्षाचे प्राण. किशोर खंडाळकर यांचे सर्वत्र कौतुक.

16

भद्रावती – दिनांक २५ ऑगस्ट ला सुमारे २ वाजता शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना भद्रावती येथील भाजी मंडीत असलेल्या हाईमास्क वर एक पक्षी अडकल्याचे तेथील सुनील गुंडावार यांच्या लक्षात आले स्थानिक लोकांना सोबत घेवून आधी त्यांनी त्या पक्षाची सुटका करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या पोल ची उंची जास्त असल्या मुळे त्यांना ते जमले नाही त्यांनी मग नगरपालिकेशी संपर्क साधला परंतु त्यांना उडवा उडवी चे उत्तर देण्यात आली त्यांनी मग इको – प्रो चे सदस्य किशोरभाऊ खंडाळकर यांना माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून थोड्या वेळाचाही विलंब न लावता ते साहित्य व आपल्या साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले.पोल ची उंची लक्षात घेवून त्यांनी एका मालवाहू गाडीचा वापर करून पोल वरती चाळण्या करिता डेकोरेशन करिता वापरण्यात येणाऱ्या दोन सिडी एकास एक बांधून वरती चाडण्याचे जुगाड तयार केले परंतु उंची जास्त असल्या मुळे ते सहज शक्य होऊ शकले नाही परत त्यांनी त्यात काही फेर बदल करून परत प्रयत्न केले यावेळेस त्यांना वरती चाडण्यात यश आले वरती चडून त्यांनी मोठ्या हिमतीने त्या पक्ष्याची सुटका करण्याचाप्रयत्न केला परंतु पतंग उडविण्या करिता वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यात ते पाखरू अडकल्यामुळे त्याला स्वतःची सुटका करता आली नाही.स्वतःचा जीव वाचविणयासाठी ते अकांता करत होते परंतु ते प्रयत्न त्याच्या जीवावर बेतत होते मांज्या मुळे त्याच्या पंखाला जखम झाली त्या मुळे ते अधिक आरडा ओरड करीत होते. मांज्या कापून त्या पक्ष्याची सुटका किशोरभाऊ नी करून त्याचे प्राण वाचविले…
या परिसरातील सूनीलभाऊ गुंडावार यांनी पर्यावर्णाप्रती जागरूकता दाखवित खूप प्रयत्न केले त्यांनी जमेल त्यांना फोन करून त्या पक्ष्या चे प्राण वाचविण्याचे प्रयत्न केले. प्रशासनाकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी मग किशोरभाऊ यांना संपर्क साधला लागेल ती मदत केली पक्षाला वाचविण्यात सहकार्य केले.
किशोरभाऊ यांनी आपल्या व्यस्त वेळातून घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तत्काळ त्या पक्षा जीव वाचाविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
इको – प्रो चे तालुका अध्यक्ष संदीप जीवने तथा अमोल दौलतकर यांनी किशोर खंडाळकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
शहरातील उंच व डेरेदार वृक्ष कापली जात असल्यामुळे पक्षी अश्या उंच खांबाचा बसण्या व घरटी बांधण्याकरिता वापर करत आहेत.तिथे आलेल्या नायलॉन मंज्या मध्ये त्या पक्ष्याचा पाय फसला व तो तिथे अडकला. त्या पक्षाचे रेस्क्यू करण्याची जबाबदारी संपूर्ण नगरपालिका प्रशासनाची होती परंतु त्याला खूप खर्च लागेल मंहून त्यांनी आपली जिम्मेदारी झटकली. ज्या विभागा कडे या हाईमॅक्स च्या मेंटेनन्स काम आहे त्यांनी हायड्रॉलिक सिडी नेहमी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी व यापुढे असेल प्रकार घडू नये या करिता नगरपालिका प्रशासनाने सज्ज राहावे ही मागणी इको-प्रो तर्फे करण्यात येत आहे