प्रस्थापितांच्या गर्दीत नगराध्यक्ष पदाकरीता बहुजन समाज पार्टीचे उमेश काकडे आघाडीवर

4

भद्रावती :

प्रस्थापित सर्व राजकीय पक्षांनी मागील २८ वर्षात पालिकेच्या राजकारणात पदाधिकारी असलेल्या जुन्याच चेहऱ्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. या सर्वांनी भद्रावती शहराचा विकास केला नाही. त्यात बहुजन समाज पार्टीने भद्रावतीच्या नगरपालिका राजकारणाला वेगळे वळण देत नविन चेहरा निवडणूक रिंगणात उतरविला. जुन्या सर्व भ्रष्ट उमेदवारांना येथील जनता कंटाळली आहे. त्यामुळे नविन चेहरा म्हणून बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश काकडे मतदारांच्या पसंतीस उतरले आहेत. नव परिवर्तनवादी विचारांचे दलित, मुस्लिम, ओबीसी मतदार एकवटल्याने उमेश काकडे आघाडीवर आहेत.

भद्रावती हे एक ऐतिहासिक त्रिधर्मीय संगमाचे शहर आहे. या शहराचा इतिहास वैभवशाली राहिला आहे. चिचोर्डी, गवराळा, विजासन, खापरी, सुमठाणा, या गावांना सामावून भद्रावती शहराची नगरपालिका बनली. या नगरपालिकेला २८ वर्षांचा काळ लोटला. परंतु गेल्या २८ वर्षात ही सर्व गावे शहरात, नगरपालिका हद्दीत येऊन देखील गावच राहिली. अजूनही या गावात प्रवेश घेतला असता ती गावेच दिसतात. शहरासारखा विकास झाला नाही. किंबहुना ही गावे शहरासारखी दिसत नाहीत. एकूणच संपूर्ण शहराने भौतिक विकास साधला नाही. भौतिक विकासच पूर्णत्वास आला नाही तर त्यापलीकडे जाऊन शहर हायटेक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकाच कुटुंबाला, एकाच पक्षाला, त्याच त्या उमेदवारांना एकहाती सत्ता देऊनही शहर विकासाच्या कोसो दूर आहे. आणि ज्यांनी गेली २८ वर्षे नगरपालिकेत प्रमुख पदे भोगली, तीच कथित नेतेमंडळी विविध पक्षात दलबदल करुन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांना प्रचार करताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रभागातून तर पळ काढावा लागला आहे. या सर्वांना आणखी संधी देण्यामागचा हेतू स्पष्ट होत नाही आहे. त्यामुळे जागृत मतदार बदलाच्या मानसिकतेत दिसून येत आहे. परिणामी त्याच त्या उमेदवारांना कंटाळलेली जनता नविन उमेदवाराला एक संधी देण्याचा विचार करीत असल्याचे दिसून येत आहे. उमेश काकडे यामध्ये तो नविन चेहरा बघुन जनता त्यांच्या पाठीशी दिसत असल्याचे चित्र आहे. म्हणूनच उमेश काकडे आघाडीवर असल्याचे राजकीय तज्ञ बोलत आहेत.

चौरंगी लढतीत उमेदवारास जिंकून येण्यास फार मतांची आवश्यकता राहत नसते. दलित, ओबीसी मतांचे समीकरण एकत्र करून उमेश काकडे विजयश्री खेचतील, असा विश्वास काकडे यांनी बोलताना दिला आहे.