चंद्रपूर :
येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी १२:२० वाजता आयोजित केल्या जात आहे. तत्पूर्वी एका आठवड्यापूर्वी पासूनच काशीच्या संतांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चना सुरू झाली आहे. देशभरात भक्तिमय वातावरण असून धार्मिक स्थळी स्वच्छता, पुजा, प्रार्थना आदी सुरू आहे. सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सामाजिक एकोप्याच्या दृष्टीने सर्व मिळून २२ जानेवारीचा दीपोत्सव साजरा करूया, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
मागील अनेक दशकांपासून अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होईल अशी आशा व अपेक्षा होती, ती आता पूर्णत्वास येत आहे. अनेक आवाहनांना व अडचणींना तोंड देवून प्रभु श्रीरामाचे मंदिर उभे झाले आहे. आणि आता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ही देशात आनंदाची घटना आहे.
संपूर्ण देशामध्ये या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे. २२ जानेवारी हा दिवस दिवाळी, दसरा या सणाप्रणाने साजरा केल्या जात आहे. या आनंदात आपण सर्वांनी सहभागी होवून संपूर्ण कुटुंबासमवेत दीपोत्सव साजरा करावा.
या औचित्यावर देशभरातील सर्वच मंदिरात विशेषत्वाने हनुमान व राम मंदिरात विधिवत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक एकोपा वृध्दिंगत होण्याच्या हेतूने सहभागी व्हावे, असेही विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले आहे.