तलावाचे अवैध उत्खनन करून सुपीक गाळ दिला विट कारखान्याला .

89

भद्रावती : मौजा कढोली येथील तलावाचे अवैध उत्खनन करून सुपीक असलेला गाळ विटकारखान्यास वीना- मोबदला देण्यात आल्याचाआरोप माजी सरपंच श्री. गणेश जिवतोडे यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार भांदककर यांची भुमीका संशयास्पद असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

मौजा कढोली येथील स.क्र. २१ ही १.२१ हे.आर. असलेली जमीन हे मामा तलाव असून याचे भोगवटदार सरकार आहे. या तलावाचा वापर गावकरी आपल्या विविध कामा करीता करत आलेले आहेत. सदर तलावातील पाणी आटल्याने येथील रहिवासी सतीश शंकर मडावी यांनी दि.29-04-2023 ला तहसील कार्यालय भद्रावती येथे तलावातील गाळ उपसुन त्यांच्या मालकीच् असलेल्या स. क्र.२५ या शेतात टाकण्या करीता परवानगी अर्ज सादर केला. त्याच दिवशी तहसील कार्यालयातर्फे जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला ज्यात अर्जदारास ३०० ब्रास गाळ उत्खनन करून वाहतूक करण्याची परवानी देण्याचे ठरले असुन ज्या कुणाच्या हरकतीअसल्यास दी. ५-०६. २०२३ ला तहसील कार्यालय भद्रावती येथे उपस्थित राहण्याचे नमुद केले.सदर कामा संदर्भात दि. ३०-०५-२०२३ ला ग्रा.पं.कार्यालय कढोली येथे ग्राम सभा घेण्यात आली यात गाळाची उपलब्धता जलसंधारण अधिकारी यांचे मार्फत घेण्यात यावी. यापूर्वी शेतीउपयोगा करीता शंकर ठवसे यांना गाळ उपसायचे नाहरकर देण्यात आले होते परंतु त्यांनी तो गाळ विट कारखाण्या करिता उपयोग केल्याने त्यांची परवानगी रद्द करावी या सह इतर बाबीवर ठराव घेवून दि. ३१ला तहसील कार्यालयास देण्यात आला.

सोबतच दी. २/६/२०२३ ला माजी सरपंच गणेश जीवतोडे व ग्रा.प सदस्य नत्थू गाडगे यांनी या तलावातील गाळ या पूर्वी परवानगी देण्यात आलेल्या ठवसे यांच्या कडून व्यवसायास वापरून कायध्याची पायमल्ली करण्यात आल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आनुण दिली तसेच रोजगार हमी अंतर्गत गावकऱ्याना देण्यावयास तलावातील माती खोदकाम हे एकच काम शिल्लक असल्याने व तलावात अतीशय कमी प्रमाणात गाळ असल्याने कुणालाही खोदकाम करण्याची परवानगी देण्यात येऊ नये या संदर्भाचे निवेदन सादर केले.

अर्ज सादर केल्याच्याच दिवशी कर्तव्यदक्ष तहसीलदार भांदाककर यांनी तात्काळ जाहीर नामा काढला त्याच दिवशी सिंचाई विभागाचा व तलाठी,यांचा अहवाल सादर झाला. एरवी कामाकरीता नागरिकांना चपला झिजवायला लावणारे अधिकारी व कर्मचारी यांनी एकाच दीवाशी हे समधे कसे काय घडवले असा सवाल जिवतोडे यांनी उपस्थीत केला .

जिवतोडे यांनी स्वतह तलावातील गाळ शेतक-यांना उपयुक्त असुन तो फक्त शेतीकामा करीताच वापरण्यात यावा इतरत्र कुठेही वापरण्यात येवू नये असा आक्षेप नोंदवला असतांना वआक्षेप घेण्याची मुदत ५ तारखेपर्यंत असताना भांदककर यांनी स्वतह या प्रकरणात अधीकचे लक्ष घालत अर्जदारास दोन तारखेलाच उत्खनव व वाहतुकीची परवानगी दिली. ज्या शेतात तलावालील गाळ टाकल्या जात आहे ते शेत मडावी यांनी निखील वानखेडे यांना विट कारखाना करीता दिले असून आज त्या ठीकानी कसलेही शेती नसुन विट कारखाना असल्याची माहीती जिवतोडे यांनी दिली.

आपल्या पदाचा गैर-वापर करत भांदककर यांनी तलावाच्या जैवविविधतेचा कसलाही विचार न करता तलाठी व जल सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अर्थपूर्ण व्यव्हार करून हे अवैध रित्या दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी व याप्रकरणात जे-जे अधिकारी कर्मचारी दोशी असतील त्यांच्यावर कठोर कारवाही करावी, अशी मागणी जीवतोडे यांनी पत्रपरिषदेत केली आहे.