सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त

34

चंद्रपूर :

येथील सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना वाणिज्य विभागातील व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयात गोंडवाना विद्यापीठातर्फे नुकतीच आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे.

जनता महाविद्यालयातील प्रा. डॉ. फुलचंद निरंजने यांच्या मार्गदर्शनात ‘चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (WCL) उद्योगामधील कंत्राटी कामगारांच्या (वर्ग ड) आर्थिक व सामाजिक स्थितीचे अध्ययन’ (कालावधी २०११ ते २०२०) या विषयावर उच्च शिक्षण व संशोधन केंद्र, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले.

सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांनी या यशाचे श्रेय मार्गदर्शक, संशोधन केंद्र, जनता महाविद्यालय तथा सरदार पटेल महाविद्यालय येथील प्राध्यापक वृंद, आप्तस्वकीय तथा मित्रमंडळी यांना दिले आहे.