जनता करीअर लाँचर चे विद्यार्थी MHT-CET मधे जिल्ह्यात अव्वल

13

चंद्रपूर :

काल (दि.17) ला सायंकाळी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार MH-CET निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये जनता करीअर लाँचर मधील बहुतांश विद्यार्थी अग्रस्थानी आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता करीअर लाँचरने इतिहास घडविला आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामध्ये अनुश्री घोडमारे, तुषार महाकुलकर, राशिक उरकुडे, ईशा राऊत, रोशन आवारी, तीलक बुरे, हर्षल पिंपलकर, हर्षाली काळे, कुणाल ठेंगणे, रोहन एकरे, प्रज्वल कुकडे, रोहन पोलेलवार, संकेत कुनघाटकर, सुशांत ढोढरे, कार्तिक निमजे, प्रणय दांडेकर, प्रतीक गेडाम, सानिका विधाते, दर्शन मोहितकर, प्रिया काकडे व इतर अनेक विद्यार्थी अव्वल आले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेतर्फे डॉ. अशोक जीवतोडे, अनुभवी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.