भद्रावती – शहराच्या मुख्य रस्त्यालगत,वनविभाग कार्यालयासमोर श्री.राजू वामनराव किन्नाके यांचे घर आहे .सुमारे १५ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी घरासमोरील रस्त्यालगत एक आवळ्याचे झाड लावले ते झाड मोठे व्हावे या करिता त्याला खतपाणी घातले. व्यवस्थित संगोपन झाल्याने ते झाड जोमाने वाढले कालांतराने त्यांच्या वडलांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर वडिलांनी लावलेल्या झाडाचे संगोपन घरच्या लोकांनी परिवारातील एका सदस्या प्रमाणे केले.परंतु काही समाजकंटकांना ते बघावले नाही मागील काही दिवसांपासून ते झाड मारावे या करिता हे समाज कंटक आटोकाट प्रयत्न करत आहेत परंतु त्याचे प्रयत्न विफल होत आहेत.
दिनांक१४ ऑगस्ट च्या मध्यरात्री या समाजकंटकांनी त्या झाडाला बुडापासून आरीने कापण्याचे प्रयत्न केले परंतु शेजारील लोक उठल्याने त्यांचे प्रयत्न फसले.ते कापलेले झाड मरू नये म्हणून घरच्या लोकांनी त्याला कापडानी व तारानी बांधून त्याला वाचविले. हा प्रयत्न फसल्या मुळे त्या समाजकंटकांनी परत दिनांक ११ सप्टेंबर चे मध्य रात्री चैनकटर च्या साहाय्याने ते झाड कापण्याचे प्रयत्न केले अर्धेअधिक झाड कापून ते खाली कोसळण्याकरिता सोडून दिले. सकाळी उठताच हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला हे कृत्य बघून घरच्या लोकांना खूप वाईट वाटले वारंवार हे कृत्य कोन करत असेल या विचाराने त्यांच्या आई ची तबीयत खराब झाली.
हे झाड नगरपालिकेच्या हद्दीत येत असल्याने राजू कीन्नाके यांनी या प्रकरणाची रीतसर माहिती नगरपालिकेला देण्याकरिता कार्यालयाची धाव घेतली परंतु त्या दिवशी कलेक्टर हॉलिडे आल्याने न प कार्यालय बंद होते.राजू कीन्नाके यांच्या घरा समोरील चौकात पोलिस विभागाने लावलेले सी सी टि व्ही कॅमेरे असल्याने त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिस विभागाला देण्याचे ठरवले त्यांनी लेखी स्वरूपात संपूर्ण प्रकरण पोलिसांना दिले परंतू हे प्रकरण आमच्याकडे येत नाही तुम्ही न प कार्यालयात जा असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले.राजू किन्नाके यांनी परत दुसऱ्या दिवशी नगरपालिका कार्यालय गाठले आणि निवेदन दिले
दोन दिवसांनी न प कार्यालयाने पोलिस विभागास पत्र पाठविले आणि शहरात अवैध रित्या वृक्षांची कत्तल कोन करत आहे या संदर्भातील सी सी टिव्ही फुटेज तपासून त्या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली . सदर घटनेला दहा दिवस उलटूनही कसल्याच प्रकारची कारवाही झाल्याचे दिसत नाही.
कसल्याही प्रकारची अडचण नसतांना अंधाराचा फायदा घेऊन कुठल्या हेतूने हे कृत्य केले जात आहे याची शहानिशा करण्याकरिता मागील दहा दिवसांपासून सामाजिक संघटना व कार्यकर्त्या तर्फे पोलिस स्टेशन च्या संबंधित विभागाला सी सी टिव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली जात आहे परंतु पोलिस विभाग या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतांना दिसत नाही.