राज्यभरातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू
राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयाच्या महासंघाची संयुक्त कृती समितीचा सहभाग
मागण्या मान्य न झाल्यास २० फेब्रुवारी २०२३ पासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद
चंद्रपूर :
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबत अनेकदा निवेदने, भेटी, बैठकी व आंदोलन होवून सुध्दा शासनाच्या उदासिनतेमुळे व पूर्वग्रहदूषित भावनेमुळे हे प्रश्न सुटलेले नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीने आयोजित केलेल्या दिनांक ६ जानेवारी २०२३ ला बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक २ फेब्रुवारी पासून राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकून टप्पा-टप्प्याने आंदोलनाची सुरवात केलेली आहे.
सदर आंदोलनातून सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करून सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचान-यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचान्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचान्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे. २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेंशन योजना लागू करणे. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे मातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे, आदी मागण्या ठेवल्या आहेत.
या आंदोलनाचे टप्पे व रुपरेषा ठरली आहे. दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार सुरू केला आहे. दिनांक १४ फेब्रुवारी २००३ रोजी दुपारी २.०० ते २.३० अवकाश काळात निदर्शने करण्यात येणार आहे. दिनांक १५ फेब्रुवारी २००३ रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणार आहेत. तर दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप असेल व दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद करण्यात येणार आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थी, विद्यापीठ व महाविद्यालयाची गैरसोय होवू नये या करीता या आंदोलनाची गंभीरता शासनाने लक्षात घ्यावी. हे आंदोलन अंत्यत नाईलाजास्तव करण्यात येत असून शासनाने सातत्याने केलेल्या उपक्षेमुळे हे शासनाने आमच्यावर लादलेले आंदोलन असल्याची भावना व्यक्त केली आहे.
प्रमुख संघटक अजय बळवंत देशमुख, प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह, मुख्य संघटक मिलिंद प्र.भोसले, मुख्य संघटक डॉ. नितीन अ. कोळी, मुख्य संघटक रा.जा. बढे, मुख्य संघटक रावसाहेब त्रिभुवन, मुख्य संघटक आनंदराव खामकर यांनी आंदोलनाबाबत कळविले आहे.