मुरूम पोखरणाऱ्यांवार प्रशासनाचा आशीर्वाद हजारो ब्रास मुरूम पोखरूनही करवाही शून्य.

110

 

भद्रावती :  भद्रावती शहरालगत असलेल्या केसूर्ली व कुरुडा परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम साठा उपलब्ध आहे याचाच फायदा घेत अवैध व्यवसाईक या मुरूमची तस्करी करण्यात अहोरात्र जुंपलेले आहेत.

सध्या घर बांधकामाचे सीजन सुरु असल्यामुळे भरण भरण्याकरिता मुरुमाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.ही मागणी पूर्ण करण्या करीता या परिसरातील ट्रॅक्टर धारक अवैध मार्गाने मुरुमाचा उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत.या प्रकारा बाबत शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहित नसणे ही खेदाची बाब आहे.अधिकाऱ्यांच्या असल्या आशीर्वादाने हे तस्कर अवघ्या काही दिवसातच मत्तबर बनले आहेत.

शहरात सुरु असलेल्या बांधकामांकारिता मोठ्या प्रमाणात मुरूमची मागणी आहे त्या करिता या परिसरातील हजारो ब्रास मुरूम अवैधरित्या जेसिबीने उत्खणन करून हायवा व ट्रॅक्टर च्या सहाय्याने बांधकाम स्थळापर्यंत पोहचविले जाते. हे सर्व होत असतांना महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग या तीनही विभागातील एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येत नाही हे विचार करण्याजोगे आहे.

या तस्करांवर एकही विभाग कारवाही करत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. कुणाचीही भीती न बाळगता मिळेल तो मार्ग वापरून अगदी पहाटे पासून तर दिवसभर ही वाहतूक सुरु असते कसल्याही प्रकारची रॉयल्टी न भरल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुळत आहे. विशेष म्हणजे मुरुमाची वाहतूक शहराच्या मधून मुख्यमार्गाने हायवा द्वारे होत असतांना कुणीच कसे कारवाही करत नाही. ही बाब शंकास्पद आहे. या मुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची या सर्व प्रकाराला मूक संमती तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.