भद्रावती नगरपरिषदेचा अजब कारभार

25

भद्रावती, दि.०१ : शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी कर सध्या वसुल केल्या जात आहे. त्या अनुशंगाने मागणी पत्र हे शहरातील प्रत्येक घरमालका पर्यंत कर्मचाऱ्यांकडून पोहचविण्याचे काम चालु आहे. मागणी पत्रानुसार दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मालमत्ता कर भरल्यास करावर कोणतेही व्याज लागणार नाही असे सांगितले जात असतांना सुद्धा मालमत्ता कर वेळेत भरूनही नागरिकांना अतिरिक्त व्याज द्यावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेहमी ३१ मार्च ही आर्थिक वर्षाची अखेरची तारीख असते आणि १ एप्रिल नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात. त्यामुळे सर्व कर हे चालु वर्षाच्या अखेर पर्यंत म्हणजे ३१ मार्च पर्यंत भरायचे असते. मात्र सध्या ३१ मार्च २०२५ पर्यंत चा मालमत्ता कर हा सहा महिने आधी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत भरण्याचे आवाहन भद्रावती शहरातील नागरिकांना केले जात आहे. नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देत कर वेळेत भरत आहे, तरि देखील नगरपरिषद भद्रावती मालमत्ता करावर अतिरिक्त व्याज वसुलत आहे. यामुळे भद्रावती शहरातील नागरिक रोश व्यक्त करत आहे. हि समस्या अनेक दिवसापासून चालु असून नगरपरिषदेने लवकरात लवकर यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

IWBS या संकेतस्थळा मध्ये तांत्रीक समस्या चालू आहे. ही प्रणाली केंद्रीय असून नगरपरिषद भद्रावती येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. समस्याची आम्हाला जाणीव असून वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली आहे. नागरिकांकडून व्याज स्वरूपात घेतलेली अतिरिक्त रक्कमेचे समायोजन करणार आहे.

विशाखा शेळकी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, भद्रावती

कर आकारण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रणाली मध्ये त्रुटी आहे हे स्पष्ट दिसत असतांना सुद्धा प्रशासनाने त्या प्रणाली व्दारे कर वसुल करणे चुकीचे आहे. वेळेत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांवर हा अन्याय असुन जो पर्यंत कर आकारणी करणाऱ्या प्रणालीतील तांत्रीक अडचणी दुर होत नाही तोपर्यंत नगरपरिषदेने ऑफलाईन पध्दतीने कर घ्यावा.