परदेश शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर येथील तीन विद्यार्थी

3

चंद्रपूर :

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ मध्ये परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने दिनांक २६ सप्टेंबर २०२४ ला पारीत केला आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या एकूण ७५ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे, हे विशेष. या सर्व ७५ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून रोहित सुरेश दिवसे, नुपूर कुंदन नायडू, स्नेहल परशुराम धोटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ओबीसी संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने सदर निर्णय घेतला व त्याचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना झाला, याचे समाधान डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे.