भद्रावती – दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात आले . त्याच निम्मिताने इको -प्रो भद्रावती तर्फे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला . या दरम्यान शहरालगत व तालुक्यात असलेल्या विजासन तलाव, चिंतामणी तलाव, मल्हार तलाव, गौराळा तलाव, दुधाळा व लेंडारा तलाव, घोडपेठ तलाव, घोट – निंबाळा तलाव तसेच डोल्हारा या तलावांवर दररोज सकाळी ६ ते ८.३० या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . ज्यात पक्षीनिरिक्षणा सोबतच पक्षांचे निसर्गात महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण,पक्षीसंरक्षण व संवर्धन कायद्या बद्दल जनजागृती या सोबतच विद्यार्थ्यां मधे पक्षांविषयी आवड निर्माण व्हावी या करिता “मी पाहिलेला स्थाणिक पक्षी” या विषयावर चित्र प्रदर्शनी घेण्यात आली ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्थ असा सहभाग घेत एकूण १९३ विद्यार्थ्यांनी आपले चित्र या प्रदर्शनीत सहभागी केले.कर्मविर विद्यालय,गवराळा च्या विध्यार्त्यांना सोबत घेवुन जनजागृती रॅली घेण्यात आली त्यानंतर पक्षांचे अधिवास, त्यांचे स्थलांतरण, निसर्गात असलेले त्यांचे महत्व,भद्रावती तालुक्यातील धोक्यात असलेल्या माळढोक पक्षी चे संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमा करिता विविध विद्यालयातील विध्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षणा करिता गवराळा येथील तलाव परिसरात बोलावून त्यांना विविध स्थानकी पक्षांसोबतच प्रवासी
पाणपक्षांची ओळख करून देण्यात आली ज्यात फेयरीलँड हायस्कूल,सेंटएनिस हायस्कूल व कर्मविर विद्यालयातील विधार्थी, पालक व शिक्षक यांच्या सोबतच हैप्पी क्लब व योग समिती, भद्रावतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पक्षीनिरीक्षणा नंतर चित्र प्रदर्शनीत आपले चित्र प्रदर्शित करणाऱ्या विध्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तीपत्र व उत्कृष्ट चित्र काढलेल्या तीन विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देवून प्रोत्साहित करण्यात आले.
या पक्षी सप्ताह दरम्यान विविध पाणवठ्यांनावर केलेल्या पक्षीनिरक्षणात एकूण १०४ प्रजातीच्या पक्षांची नोंद करण्यात आली. या पक्षीनिरीक्षणास शहरातील युवकान सोबतच वरोरा व चंद्रपूर येथील पक्षी प्रेमी युवाकांनी हजेरी लावली.