पी.एच.डी. प्रक्रिया दोषरहित व गतिमान करा

69

चंद्रपूर :

आज (दि.४) ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे कुलगुरू, प्र-कुलगुरू, सिनेट सदस्य तथा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. प्रक्रियेसंदर्भात अनेक समस्या मांडल्या. विद्यापीठात मागील अनेक वर्षेपासून पीएचडी विभागात पीएचडी करीता विसंगत व अतिरिक्त कठोर नियम बनवून ठेवण्यात आले होते. त्यावर सखोल चर्चा झाली. त्या सर्व समस्यांना सकारात्मक घेत संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रशांत बोखारे यांनी दिले.

यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोखारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मानव्यविज्ञा शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, सिनेट सदस्य डॉ. विवेक गोरलावार, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. मिलिंद भगत, डॉ. नरवाडे, डॉ. दिलीप चौधरी, तथा संशोधक विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत पी.एच.डी. प्रक्रिया युजीसी ऑर्डीनंस मधे जे नियम नमूद आहेत त्याच नियमांच पालन करून राबवावी, याबाबत चर्चा झाली. कुलगुरु तथा प्र-कुलगुरू हे कमालीचे सकारात्मक होते. सदर बैठक आटोपताच लगेच या विषयावर समिती नेमून बैठक घेण्यात आली. व या बैठकीत युजीसी ऑर्डीनंस नुसार विद्यापीठाच्या विद्यमान नियमात बदल करण्यात येणार आहे.

यामधे युजीसी ऑर्डीनंस नुसार पार्ट टाइम व फुल टाइम विद्यार्थ्यांना थेसिस सबमिशन कालावधी कमीतकमी सरसकट तीन वर्षे करण्यात यावी, संशोधन दरम्यान रिसर्च पेपर प्रकाशित करणे ही बाब ऐच्छिक करणे किंवा किमान एक रिसर्च पेपर प्रकाशित करण्याची अट ठेवण्यात यावी, त्यात निव्वळ युजीसी केअर लिस्टेड जर्नल मधेच रिसर्च पेपर प्रकाशित व्हावा, ही अट ठेवू नये, पीयर रीव्हिव किंवा इतर जर्नल स्वीकारावे, युजीसी ऑर्डीनंस शी विसंगत असलेली दि. ३० डिसेंबर २०२१, दि. ०५ ऑगस्ट २०२२, दि. २५ जुलै २०२३ चे परिपत्रक व अधिसूचना तात्काळ रद्द करा, संशोधन कालावधी तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तीन महिन्याच्या आत सबमिशन प्रक्रिया ज्यामधे प्री-सबमिशन वायवा, पी. आर. रिपोर्ट, प्लैगरीझम थेसिस सबमिशन पूर्ण व्हावी, व पीएचडी विभागात थेसिस सबमिट केल्यापासून एक महिने आत आरआरसी लागावी, याकरीता कालमर्यादा ठरवून द्यावी, पीएचडी करताना विद्यापीठात पीएचडी विभाग व रिसर्च सेंटरवर प्रत्येक पायरीला जी अवाढव्य फिज लागते, ती कमी करण्यात यावी, आरआरसी नंतर थेसिस परीक्षण करीता राज्याबाहेरील व राज्यातील सब्जेक्ट एक्स्पर्ट कडे थेसिस ताबडतोब पाठवावी, संशोधक विद्यार्थी हे पीजी, नेट, सेट करून पीएचडी करतात म्हणून त्यांना रिसर्च सेंटर व पीएचडी विभाग येथे सन्मानजनक वागणूक मिळावी, आदी मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली व यावर कुलगुरूंनी सकारात्मकता दाखवून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.

विद्यापीठाच्या सकारात्मक निर्णयाचे रविकांत वरारकर, मोहित सावे, अमोल कुटेमाटे, सुनील चिकटे, सोहम कोल्हे, जगदीश चिमुरकर, राहुल लभाने, नाहिद एन. हुसेन, संतोष कावरे, अमर बलकी, किशोर महाजन, विठ्ठल चौधरी, बर्डे सर, स्वप्नील ढोमणे, डेव्हिड बनसोड, अनिल पेटकर, मनोज वारजुरकर, नितेश पुण्यप्रेड्डीवार, गणेश येरगुडे, अतुल बारसागडे, चरित्र नागराळे, अमोल बोरकुटे, गणेश उपरकर, महेश यार्दी, मोहनीश माकोडे, रीना लोणारे, लिपिका रॉय, अनुपमा मॅडम, प्रिती बोबडे, अमोल ठाकरे, महेश काकडे, मोहनीश माकोडे, आशिष देरकर, शुभांगी भेंडे शर्मा, संदीप आर. देशमुख, लक्ष्मीकांत कापगते, राजाराम साळुंके, गजानन वि ढोले, अविनाश डी. भुरसे, आदी अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.आज (दि.४) ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे कुलगुरू, प्र-कुलगुरू, सिनेट सदस्य तथा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. प्रक्रियेसंदर्भात अनेक समस्या मांडल्या. विद्यापीठात मागील अनेक वर्षेपासून पीएचडी विभागात पीएचडी करीता विसंगत व अतिरिक्त कठोर नियम बनवून ठेवण्यात आले होते. त्यावर सखोल चर्चा झाली. त्या सर्व समस्यांना सकारात्मक घेत संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रशांत बोखारे यांनी दिले.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोखारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मानव्यविज्ञा शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, सिनेट सदस्य डॉ. विवेक गोरलावार, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. मिलिंद भगत, डॉ. नरवाडे, डॉ. दिलीप चौधरी, तथा संशोधक विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत पी.एच.डी. प्रक्रिया युजीसी ऑर्डीनंस मधे जे नियम नमूद आहेत त्याच नियमांच पालन करून राबवावी, याबाबत चर्चा झाली. कुलगुरु तथा प्र-कुलगुरू हे कमालीचे सकारात्मक होते. सदर बैठक आटोपताच लगेच या विषयावर समिती नेमून बैठक घेण्यात आली. व या बैठकीत युजीसी ऑर्डीनंस नुसार विद्यापीठाच्या विद्यमान नियमात बदल करण्यात येणार आहे.
यामधे युजीसी ऑर्डीनंस नुसार पार्ट टाइम व फुल टाइम विद्यार्थ्यांना थेसिस सबमिशन कालावधी कमीतकमी सरसकट तीन वर्षे करण्यात यावी, संशोधन दरम्यान रिसर्च पेपर प्रकाशित करणे ही बाब ऐच्छिक करणे किंवा किमान एक रिसर्च पेपर प्रकाशित करण्याची अट ठेवण्यात यावी, त्यात निव्वळ युजीसी केअर लिस्टेड जर्नल मधेच रिसर्च पेपर प्रकाशित व्हावा, ही अट ठेवू नये, पीयर रीव्हिव किंवा इतर जर्नल स्वीकारावे, युजीसी ऑर्डीनंस शी विसंगत असलेली दि. ३० डिसेंबर २०२१, दि. ०५ ऑगस्ट २०२२, दि. २५ जुलै २०२३ चे परिपत्रक व अधिसूचना तात्काळ रद्द करा, संशोधन कालावधी तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तीन महिन्याच्या आत सबमिशन प्रक्रिया ज्यामधे प्री-सबमिशन वायवा, पी. आर. रिपोर्ट, प्लैगरीझम थेसिस सबमिशन पूर्ण व्हावी, व पीएचडी विभागात थेसिस सबमिट केल्यापासून एक महिने आत आरआरसी लागावी, याकरीता कालमर्यादा ठरवून द्यावी, पीएचडी करताना विद्यापीठात पीएचडी विभाग व रिसर्च सेंटरवर प्रत्येक पायरीला जी अवाढव्य फिज लागते, ती कमी करण्यात यावी, आरआरसी नंतर थेसिस परीक्षण करीता राज्याबाहेरील व राज्यातील सब्जेक्ट एक्स्पर्ट कडे थेसिस ताबडतोब पाठवावी, संशोधक विद्यार्थी हे पीजी, नेट, सेट करून पीएचडी करतात म्हणून त्यांना रिसर्च सेंटर व पीएचडी विभाग येथे सन्मानजनक वागणूक मिळावी, आदी मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली व यावर कुलगुरूंनी सकारात्मकता दाखवून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
विद्यापीठाच्या सकारात्मक निर्णयाचे रविकांत वरारकर, मोहित सावे, अमोल कुटेमाटे, सुनील चिकटे, सोहम कोल्हे, जगदीश चिमुरकर, राहुल लभाने, नाहिद एन. हुसेन, संतोष कावरे, अमर बलकी, किशोर महाजन, विठ्ठल चौधरी, बर्डे सर, स्वप्नील ढोमणे, डेव्हिड बनसोड, अनिल पेटकर, मनोज वारजुरकर, नितेश पुण्यप्रेड्डीवार, गणेश येरगुडे, अतुल बारसागडे, चरित्र नागराळे, अमोल बोरकुटे, गणेश उपरकर, महेश यार्दी, मोहनीश माकोडे, रीना लोणारे, लिपिका रॉय, अनुपमा मॅडम, प्रिती बोबडे, अमोल ठाकरे, महेश काकडे, मोहनीश माकोडे, आशिष देरकर, शुभांगी भेंडे शर्मा, संदीप आर. देशमुख, लक्ष्मीकांत कापगते, राजाराम साळुंके, गजानन वि ढोले, अविनाश डी. भुरसे, आदी अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.