राळेगाव रेती घाटातून होडी (बोट) द्वारे रेतीचा अवैध उपसा

34

भद्रावती :

माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत (दि.२१) रोजी रात्रौ. ११ च्या दरम्यान मौजा राळेगाव (रिठ) येथील वर्धा नदी घाटावर प्राप्त माहीतीनुसार धाड मारण्यात आली. सदर कारवाई वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

रेतीचा उपसा करण्याकरीता डिझल इंजिन लाऊन वर्धा नदीच्या राळेगाव रेती घाटातून होडी (बोट) मध्ये अवैधरीत्या रेती चोरी सुरू होती. यवतमाळ जिल्हाधिकारी यांचे आदेशांचे उल्लंघन करुन चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीमध्ये वर्धा नदीचे पात्रात रेती जमा करुन हायवा ट्रकने अवैद्यरित्या रेतीची तस्करी करण्याचे प्रकार सुरू होते. सदर रेती तस्करी आढळून आल्याने वापरन्यात आलेले पोकलँन मशीन, टिनाचे पत्र्याची होडी (बोट), डिझल ईंजिन व लोखंडी पाईप असा एकून ३०,७०,०००/- रुपयाचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त केला.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, कट रचुन चोरटया पद्धतीने मोठया प्रमाणात रेती मिळविण्यासाठी जाणिवपूर्वक रेतीचे अवैद्य उत्खनन करुन चोरी करण्याचे प्रकार मागील कित्येक दिवसांपासून सुरू होते. तसेच वर्धा नदीचे पात्रातील रेतीची आगळीक केली. नदीचे पिण्यास योग्य पाणी दुषित करण्यास रेती तस्कर कारणीभुत ठरले. तसेच गैरपणे पाण्याचे दिशेत बदल करुन होडीचा (बोट) वापर करुन रेतीचे अवैध उत्खनन केले. शेतीमध्ये व पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतांनासुद्धा नदीच्या पाण्याचे निचरा प्रक्रियेस क्षती पोहचविली.

या गुन्ह्यासाठी आरोपी शेख शेहजाद शेख निशाद रा. यवतमाळ, आरीफ अहेमद सिद्दीकी अहेमद रा. यवतमाळ, सैय्यद कादर सैय्यद दाऊद रा. यवतमाळ व सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद रा. यवतमाळ तथा ईतर दोन ईसमा विरुद्ध (दि.२२) रोजी अप क्र. १९ /२०२४ कलम ३७९, ४३०,४३१, १०९, १२० (ब),१८८, भांदवी सह कलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमिन. महसुल अधिनियम १९६६ अन्वये माजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करन्यात आला.

वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचे गोपनिय माहितीवरुन माजरी ठाणेदार सपोनि योगेश खरसान सोबत पोउपनि भोजराम लांजेवार, सफौ बंडु मोहुर्ले, पोलीस अंमलदार गुरु शिंदे व गजानंद पोले यांच्या टिमने गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधिक्षक, चंद्रपूर व वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात माजरी ठाणेदार श्री. योगेश खरसान करित आहे.