भद्रावतीत केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर ४ फेब्रुवारीला

46

भद्रावती :
केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर दि.४ फेब्रुवारी रोज रविवारला स्थानिक हनुमान मंदिर, संताजी नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. लोहर्णा मंगरुळकर यांच्या पुढाकाराने सदर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामधे वातदोष, लकवा, पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखी, गुडघेदुखी, सायटिका, नस लागणे, हाला हाळांमधिल गॅप, मायग्रेन, झोप न येणे डिप्रेशन, चक्कर येणे, जुनी डोकेदुखी, जुनी सर्दी, दमा, एलर्जी, श्वास फुलने, अपचन, पाईल्स, फिशर, आदि रोगांवर पंचकर्माच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहे.
पंचकर्म ही आयुर्वेदाशी संबंधित जुनी चिकित्सा पद्धती असून जुनाट आजारांवर या पध्दतीच्या माध्यमातून उपचार केला जातो. शरीरातील घाण बाहेर काढल्या जावून रक्ताभिसरण व्यवस्थित होते तथा नसा मोकळ्या केल्या जातात. एक प्रकारे शरीराचे शुध्दीकरण पंचकर्माच्या माध्यमातून होत असते.
या शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ. मंगरुळकर (8975656133) यांनी केले आहे.