चंद्रपूर :
नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत राज्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तीनही पक्ष ईतर पक्षांना सोबत घेवुन महाविकास आघाडी करुन जनतेसमोर गेले व राज्याच्या जनतेनेही या महाविकास आघाडीला भरघोष यश दिले. याची परिणीती भविष्यातही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकी करीता हे तीनही पक्ष व ईतर मित्रपक्ष महाविकासआघाडी करुनच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका काही महीन्यातच होवु घातल्या आहेत. राज्यात निवडणूकींचे वारे वाहु लागल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात महाविकासआघाडीतील पक्षातील नेते दावे प्रतिदावे करु लागले आहेत. काँग्रेसने सहाही विधानसभेवर आपलाच दावा सांगितला असुन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने जिल्ह्यातील कोणत्याही एका विधानसभेसाठी मागणी केली आहे. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नेत्यांनी बल्लारपूर विधानसभेचा हट्ट धरला असल्याचे सुत्राकडुन कळते.
अशातच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी बल्लारपूर, वरोरा व चंद्रपुर या तिन्ही विधानसभेवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दावा केला आहे.
पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना राज्यातील २८८ विधानसभेत विधानसभानिहाय बाधंणी करुन निवडणुकीकरीता तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीकरीता भविष्यात महाविकासआघाडीत निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने शिवसेना नेते, पुर्व विदर्भ संपर्कप्रमुख आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात पुर्व विदर्भातील विधानसभानिहाय तयारी लोकसभा निवडणुक संपताच सुरु झाली. या संदर्भात दि.१६ जुन २०२४ ला नागपुर येथे आमदार भास्कर जाधव यांनी पुर्व विदर्भातील विधानसभा निहाय उमेदवारांची चाचपणी केली.
महाविकासआघाडीत विधानसभा निवडणुकीत समोर जायचे असल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील चंद्रपुर, वरोरा व बल्लारपूर या तीन विधानसभा क्षेत्रावर शिवसेना पक्षाचा उमेदवार लढविण्याचा जिल्हाप्रमुखांनी दावा केला असुन याबाबत पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांचे सुचनेवरुन बल्लारपूर, वरोरा व चंद्रपुर या तीनही विधानसभा निहाय क्षेत्राची माहीती सादर करण्यात आली. याबाबत पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सुध्दा ही माहीती पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी अवगत केली असल्याची माहिती आहे.
वरोरा, बल्लारपूर विधानसभेत वंदनिय हिन्दुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के सामाजिक व २० टक्के राजकारण सेवा अंगीकृत करुन सतत सामाजिक कार्य, पक्षसंघटन, मतदार बांधणी मागील काही वर्षापासुन सतत सुरु आहे. त्यासोबतच चंद्रपुर विधानसभेवर सुध्दा दावा केला असुन चंद्रपुर विधानसभा सुध्दा शिवसेनेचा गड असुन चंद्रपूर महानगरपालिकेत सतत नगरसेवक तसेच विधानसभाक्षेत्रातील जिल्हा परिषद क्षेत्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य सतत जनतेने निवडुन दिले आहेत. शिवसेनेचा चंद्रपुर महानगरपालिकेवर उपमहापौर सुध्दा होता. जिल्हयात या पुर्वी शिवसेनेचे आमदार सुध्दा जनतेने निवडुन दिले आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक व सर्व पक्षाच्या विंग जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांचे मार्गदर्शनात जिद्दीने कामाला लागले असुन या तिन्ही मतदार संघात विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणी तयारी सुध्दा सुरु असुन लवकरच पक्षप्रमुखाच्या आदेशाने पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकातुन उमेदवारी देण्यात येईल. कुठलाही बाहेरचा उमेदवार आयात केला जाणार नाही, अश्या सुचना सुध्दा पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांनी जिल्हाप्रमुखासह पदाधिकारी यांना दिल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे चंद्रपूर विधानसभा, बल्लारपूर विधानसभा व वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता शिवसेनेचे जयदीप रोडे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकरीता जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे , मुकेश जिवतोडे यांचे नावाची चर्चा आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संदीप गिऱ्हे यांचे दौरे सुरू आहेत. मुल-बल्लारपूर विधानसभेला समोर ठेवून त्यांचे नियोजनबध्द काम सुरु आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात या पूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेचा उपाध्यक्ष शिवसेनेचा राहिला आहे. स्वबळावर शिवसेनेने येथे बरेच नगरसेवक निवडून आले आहेत. सन २०१४ मध्ये शिवसेना स्वबळावर लढल्याने शिवसेना उमेदवारास ५१ हजार मताधिक्य घेतले होते. यामुळे या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला चांगला वाव आहे. जयदीप रोडे हे मागील अनेक वर्षांपासून शहरात कार्यरत असून येथे सुपरिचित चेहरा आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात रविंद्र शिंदे यांचे कार्य जोरदार सुरु आहे.
रविंद्र शिदे यांना सामाजिक, राजकिय व सहकार क्षेत्राचा अनुभव बघता त्यांची बाजु भक्कम असुन ते परिपक्व व मुसद्दी राजकारणी म्हणुन त्यांचेकडे बघितले जाते. वरोरा विधानसभा क्षेत्रात त्यांनी कोरोना काळापासून सतत काम करीत असुन सामाजिक उपक्रम राबवत पक्ष संघटन सुध्दा मजबुतीने उभारले असुन प्रस्थापीताच्या विरोधात शिवसैनिकांना व पक्ष पदाधिकारी यांना सोबत घेवुन अनेक निवडणुका सतत जिंकल्या असुन विजयी रथ सुरुच आहे. मुकेश जिवतोडे हे सुध्दा जनसेवेत आहेतच. व हा मतदार शिवसेनेचा बालेकिल्ला सुध्दा राहीला आहे.
पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांचा राजकिय अनुभव दांडगा असुन लोकहितार्थ निर्णय घेण्यास त्यांनी आपल्या शैलीत राज्याची विधानसभा गाजवली सुध्दा महाराष्ट्रातील राजकारणातील अजात शत्रु म्हणुन त्याचे कडे पाहले जाते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा पुर्व विदर्भात पक्षाला नक्कीच होणार व त्यांचे मार्गदर्शनात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीनही जिल्हाप्रमुख व जयदीप रोडे संपूर्ण तयारीनिशी कामाला लागले असुन त्यांचे सुचनेवरुन *हम सब साथ साथ है* ब्रीदवाक्य घेवुन जुने सर्व हेवेदावे विसरून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्ह्यातील तीनही जिल्हाप्रमुख एकत्र होवून कामाला लागले आहे. पक्ष संघटन मजबूत करुन जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा चंग तीनही जिल्हाप्रमुखांनी बांधला आहे. पक्षप्रमुखांचे जे आदेश येतील त्याचे पालन करु, असे रविंद्र शिंदे यावेळी म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे कामकाज हे पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्वात पार पडले. दरम्यान या काळात जगावर महाभयंकर कोरोनाचे सकंट आले व या कोरोना काळात राज्यातील जनतेला कुटुंबप्रमुख बनुन कोराना महामारी सकंटातुन बाहेर काढले. इतकेच नव्हे लोकहिताचे निर्णय घेत शेतकरी बांधवांची एक वेळ नव्हे तर दोनदा कर्ज माफी केली. शेती मालाला भाव सुध्दा शेतकरी बाधंवाच्या मनासारखा दिला ईतकेच बेरोजगारांना रोजगार देवुन समाजाच्या शेवटच्या टोका पर्यत सेवा दिली. जनतेने सुध्दा स्वीकृत करुन नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकासआडी (इंडिया) च्या बाजुने देत भरघोस यश देत एक प्रकारे महाविकासआघाडी सरकारच्या बाजुने विजयाचा कल दिला.
परत एकदा शिवसेनेची सत्ता बसविण्याकरीता चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील. ना. उध्दव ठाकरे साहेब राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री बनावे, हिच आमची इच्छा आहे, चंद्रपुर जिल्यातील बल्लारशहा, वरोरा व चंद्रपुर या विधानसभावर आमचा दावा राहील असे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले असुन याबाबत पक्षप्रमुखांचे जे आदेश देतील त्या आदेशाने निवडणुकांना समोर जावु परंतु सध्यस्तिथीत बल्लारपूर, वरोरा व चंद्रपुर विधानसभेवर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दावा राहील व याबाबत बुथ निहाय माहीती सुध्दा पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांना दिली, असे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी सांगितले.