ॲड. राहुल घोटेकर यांच्या सोबत श्री. स्वप्नील कांबळे यांनी दिला भारतीय जनता पार्टीचा राजीनामा

12

चंद्रपूर :

भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर (शहर) उपाध्यक्ष ॲड. राहुल अरुणजी घोटेकर आणि चंद्रपूर (शहर) सचिव स्वप्नील रमेश कांबळे यांनी त्यांच्या पदावरून (दि.९) ला राजीनामा दिला आहे. सदर राजीनामा भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर (शहर) अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

ॲड. राहुल घोटेकर हे चंद्रपूर शहर महानगरपालीका जटपुरा प्रभाग क्र ७ चे माजी नगरसेवक, मनपा झोन क्र. १ चे माजी सभापती तसेच मनपा माजी स्थायी समिती सदस्य होते. ॲड. राहुल घोटेकर हे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदारकीची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि तशी तयारी देखील त्यांनी अविरत सुरु ठेवली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षातून अधिकृत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कारण अद्याप कळू शकले नाही, मात्र लवकरच नविन राजकीय घडामोड होईल, असे संकेत ॲड. राहुल घोटेकर यांनी दिले आहे. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.