पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अतुल कोल्हे यांची नियुक्ती

5

भद्रावती :-
पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी भद्रावती येथील पत्रकार अतुल सुरेश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, दलित मित्र तथा आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांच्या हस्ते चंद्रपूर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या एका सभेत प्रदान करण्यात आले. कोल्हे यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला गती प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.