डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

15

चंद्रपुर (का.प्र.) :
विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस (दि.11) रोज मंगळवारला दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार एड. वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शरयू तायवाडे, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष एड. देविदास काळे, कासरा मराठी चित्रपटाचे निर्माते रवि नागपुरे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, भारतीय जनता पार्टीचे देवराव भोंगळे, ॲड. अभयजी पाचपोर, मोहन दीक्षित, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिनेश चोखारे, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, सामाजिक कार्यकर्ते मंगल बलकी, ईको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे, गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, प्रकाश पाटील मारकवार, डॉ. सुरेश महाकूलकर, माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, माजी प्राचार्य उमाटे, प्रा. डॉ. किर्तीवर्धन दिक्षित कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पी.एम. सातपुते, बंडोपंत बोढेकर, चंद्रकांत गोहोकर, संध्याताई गोहोकर, बबनराव वानखेडे, दत्ता हजारे, धनराज आस्वले, प्राचार्य एम. सुभाष, चंदू वासाडे, विजय बदखल, दीपक जेऊरकर, दिलीप चौधरी, अशोक वाठ, सामाजिक कार्यकर्ते प्रभुजी देशपांडे, सुरेश चोपणे, रघुवीर अहिर, खुशाल बोंडे, हरीश शर्मा, मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, नामदेव डाहुले, विशाल निंबाळकर, रणजित डवरे, एड. आशीष धर्मपुरीवार, नितीन रामटेके, विलास माथनकर, भाऊराव झाडे, विजय मुसळे, अतुल देऊळकर, डॉ. चक्रवर्ती, माजी प्राचार्य उमाटे, सतीश भिवगडे, अमित उमरे, अशोक नागापुरे, अजय बलकी, अनिल शिंदे, प्राचार्य काकडे, प्रेमलाल पारधी, साजन गोहने, निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, काँग्रेसचे नेते रामू तिवारी, महेश मेंढे, दीपक जयस्वाल, प्राचार्य काटकर, पीआय मडावी, रवि झाडे, मोहन पारखी, अशोक पोफळे, आदी अनेकांची उपस्थीती होती. तसेच शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर शुभेच्छा प्रदान करण्यास मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे, अंबर जीवतोडे, सौ. रोहिणी अंबर जीवतोडे व संपूर्ण कुटुंबाच्या तथा जनता परिवाराच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
विविध कार्यक्रमांमधे डॉ. अशोक जीवतोडे यांच्या वजनाच्या भारोभार अन्नधान्य वृध्दाश्रमामधे वाटप करण्यात आले. रुग्णालयामधे फळं वाटप करण्यात आले. सोबतच चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेत शेतकरी आत्महत्याग्रस्त, पूरग्रस्त, कोविड-१९ ने मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांना निःशुल्क प्रवेश, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शैक्षणिक साहित्य, पुस्तक भेट व निःशुल्क प्रवेश, महाविद्यालयीन परीसरात वृक्षारोपण, आदी उपक्रम राबविण्यात आले.
डॉ. अशोक जिवतोडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जिवनाची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहो, त्यांच्या माध्यमातून विदर्भ विकास, ओबीसी समाजाचे कार्य व बहुजन समाजाची सेवा घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
शुभेच्छांसाठी यावेळी मान्यवर, पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरीक तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एकच गर्दी केलेली होती.

केंद्र सरकारने ओबीसींच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे डॉ. अशोक जीवतोडे यांची मागणी

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आरूढ आहे. मागील दहा वर्षांत मोदी सरकारच्या काळात देशात विकासाला मोठी गती मिळाली. आता एनडीए सरकारने देशातील ओबीसींचे मागील वर्षांनुवर्षांपासून रेंगाळत असलेले विविध प्रश्न प्राधान्याने सोडवावे, अशी मागणी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे.