*मोकाट जनावरांना लावली सेफ्टी रिफ्लेटर बेल्ट*

9

भद्रावती= दि. 19 ऑगस्ट

मोकाट जनावरांमुळे मुख्यतः महामार्ग व शहरातील मुख्यमार्गावर होणारे अपघात टाळण्या करिता शहरातील सार्ड संस्थे मार्फत माननीय श्री. पशु चिकित्सा व्यवसाय संघटनाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दत्ता नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती शहरातील हायवे रोड, मार्केट रोड तसेच तहसील परिसरातील मोकाट जनावरांना सेफ्टी रिफ्लेक्टर बेल्ट लावण्यात आले.

या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना रस्त्यावर असलेल्या जनावरांचा सहज अंदाज येऊन अपघात टाळण्यास मदत होईल. या सामाजिक उपक्रमाला सार्ड संस्थाचे विशेष सहकार्य लाभले.

सेफ्टी रिफ्लेक्टर बेल्ट लावताना डॉ. श्री. दत्ता नन्नावरे यांच्यासह सार्ड संस्थेचे कार्यकर्ते अनुप येरणे, आशिष चहाकाटे, श्रीपाद बाकरे, शैलेश पारेकर, शिवम कुचेकार, ओम घानोडे, यश भसाशंकर, अभी नाकोडे , लोकेश डूडूरे आणि सहकारी मित्र उपस्थित होते.