विजेच्या धक्याने गाभण गायीचा मृत्यू. दूध उत्पादक व्यावसायिकांचे मोठे नुकसान.

3

भद्रावती = स्थानिक किल्लावर्ड येथे नव्याने बनविण्यात आलेल्या श्री गिरीश पद्मावार व्यांच्या मालकीचे छत्रपती ले आऊट आहे.याच ले आऊट मध्ये पाचभाई यांच्या मालकीचा एक प्लॉट आहे जिथे दहा ते पंधरा गायी पाळून ते दुग्ध व्यवसाय करतात. आज दिनांक 12 सप्टेंबर ला नेहमीप्रमाणे गायींचे दूध काढल्यानंतर चरण्यासाठी परिसरात मोकळे सोडले गोठ्यापासून साधारण 50 मीटर दूर जाताच त्या गाईला विजेचा धक्का लागला व ती आरडाओरड करुलागली आवाज ऐकतच पाचभाई धावत गेले आणि गाईला काय झाले ते बघायला हात लावणारच तेवढ्यात त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवले त्या मुळे होणारे मोठे नुकसान टळले.

प्रथम पाहणी केली असता नागरिकांच्या असे लक्षात आले की विजेचे तार ही इन्सुलेटर वर न बांधता ते असेच मेटल क्लँप वर आहेत त्यामुळे त्या पोलला करंट आला वा आजूबाजूला पाणी असल्यामुळे त्या गाईला विजेचा धक्का बसला व ती जागीच मृत झाली. पोल उभारणी पासूनच हे तार फिटिंग करायचे सुटले असावे अशी चर्चा परिसरात करण्यात येत आहे. हे गाय संपूर्ण परिसरात लाडकी होती ती प्रत्येकाच्या घरी जायची व परिसरातील प्रत्येक घर तिला जेवायला वळायचं लहान मुला सुद्धा तिला खूप प्रेम करायचे. या गायीच्या जाण्याने परसिरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या पूर्वीही याच व्यावसायिकाची एक गाय नगरपालिकेच्या खुल्या गटारात पडल्याने मेली व आता महावितरण च्या चुकीमुळे गाभण असलेलेली गाय मरण पावल्याने त्यांचे जवळपास 80 हजाराचे नुकसान झाल्याचे पाचभाई म्हणाले या नुकसानीची भरपाई महावितरण नि द्यावी व ही तार कसे काय खुले सोडण्यात आले याची सखोल चौकशी ची मागणी त्यांनी केली आहे.