राज्य कर्मचार्याच्या संपाला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा.

82

भद्रावती –

समस्त राज्य कर्मचारी सरकारी कर्मचारी संघटने तर्फे जूनी पेंशन योजना लागु करण्यात यावी यासाठी दि.१४ मार्च पासून संप पुकारण्यात आलेला आहे.वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष अड़.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन योजना लागु झाली पाहिजे ह्या मागनीला जाहिर समर्थन दिलेले आहे .केंद्र सरकारने 2004 ला नविन पेंशन योजना सुरु केलि त्यावेळी अड़.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी ह्या नविन पेंशन योजनेला विरोध केलेला होता.
खासदार,आमदार ह्यांनी स्वतचे पेंशन सुरक्षित ठेवून,केंद्र व् राज्य सरकारी कर्मचार्यांचे जुने पेंशन बंद केलेले आहे.
समस्त राज्य कर्मचाऱ्यांनी जूनी पेंशन योजना लागु झाली पाहिजे ह्या मागणी ला वंचित बहुजन आघाडीचे जाहिर समर्थन असून आम्ही आपल्या लढयात सहभागी आहोत असे जाहिर केले.

तहसील कार्यालय भद्रावती येथे व् नगर परिषद् भद्रावती येथे संपकरी कर्मचारी ह्यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी,नगरसेवक व् कार्यकर्ते ह्यांनी भेट देवून समर्थन पत्र दिले.