रक्ताच्या थारोळ्यात मंदिरात मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ

122

भद्रावती :-
भद्रावती तालुक्यातील मांगली गावालगत असलेल्या जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मधुकर खुजे व बाबुराव खारकर असे मृतकाचे नाव असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. जगन्नाथ बाबा मंदिरात असलेली दानपेटी ही फोडलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे दानपेटी फोडायला आलेल्या दरोडेखोरांनी हत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली येथील मधुकर खुजे व बाबुराव खारकर यांची शेती गावातील जगन्नाथ महाराज मठा लगत आहे. हे दोघेही रोज शेतात जागलीसाठी जात. मंदिर लागून असल्याने रात्र च्या वेळी ते मंदिरात झोपायचे. नेहमीप्रमाणे ते शेतात जाऊन मंदिरात झोपले असता बुधवारच्या पहाटेला मंदिरामध्ये या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली. या सर्व घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी स्वानपथक बोलावले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.