मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नकोच. डॉ. अशोक जिवतोडे.

122

 

*मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नक्कोच*

*मा. हंसराज अहिर यांचे वक्तव्य खेदजनक : डॉ. अशोक जिवतोडे*

  1. चंद्रपूर :

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी महाराष्ट्राने शिफारस केल्यास मराठ्यांना ओबीसीत स्थान देवू असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याबद्दल ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी निराशा दाखवून खंत व्यक्त केली आहे.
माजी खासदार व देशाचे माजी मंत्री हंसराज अहिर हे ओबीसी मतदारांच्या भरोश्यावर उच्च पदावर गेले. आज त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद प्राप्त झाले. त्यांच्या कडून ओबीसी समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. इतके दिवस झाले अहिर हे ओबीसी समाजात वावरत आहेत. त्यांना ओबीसी समाजातील समस्यांची जाण आहे, तरी देखील त्यांचे हे वक्तव्य खेदजनक व संतापजनक आहे. या अगोदर ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये, याकरीता अनेक निवेदने, मोर्चा, धरणे, व विविध आंदोलने केलेली होती, याची जाण त्यांनी ठेवावी, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.