शेतकऱ्यांचा विराट मोर्चा

122

शेतकऱ्यांच्या विविध समस्या करिता वरोरा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा.

हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी.

#Shetkari #Farmer #Morcha #Rameshrajurkar #Vidarbha #Chandrapur

वरोरा : वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या समस्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते श्री रमेश राजूरकर व सामाजिक कार्येकर्ते श्री किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात वरोरा तहसील कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा ३१ जानेवारीला दुपारी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा निघुन तहसील कार्यालयात धडकला.
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची अजूनही शासन दरबारी थट्टा केली जात आहे. शासनाच्या विविध योजना राबविल्या जात नाही व शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पिकाला योग्य भाव दिल्या जात नसल्याने वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे हत्यार वापरले असतांनाही शासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसून शेतकऱ्यांची अजूनही थट्टा केली जात आहे. ह्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते.

  • कापूस, सोयाबीन पीकांवरील आयात थांबवून निर्यातीबाबत निर्णय घेणे, ज्या शेतकन्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांत पूर्ण रक्कम देण्यात यावी,शेतमालावरील वायदे बंदी उठवावी,थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापण्या येवू नये,चालू कर्जदार शेतकऱ्यांना माफीचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा, शेती मशागत, पेरणी ते माल विकण्यापर्यंत येणाऱ्या खर्चावर दीड पट भाव शेतमालाला देण्यात यावा, नाफेड द्वारे होणारी चना खरेदी प्रति हेक्टर ७.५ वरून १५ क्विंटल करण्यात यावे,अतिवृष्टी मदतीपासून दूर राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा, ज्या शेतकन्यांनी वीज डिमांड भरली आहे अशा शेतकऱ्यांना दोन महिन्यात कृषी पंप वीज जोडणी देण्यात यावी,स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, ऑनलाईन ७/१२ मधील चुका सरकारने लवकर दुरुस्ती कराव्यात, शेतीचे कामे संपल्यानंतर शासनामार्फत शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, ई-पिक पाहणी पटवारी किंवा ग्रामसेवक यांच्यामार्फतच करण्यात यावी इत्यादी मागण्या शेतकऱ्याकडून करण्यात आल्या.
    शेतकरी नेते रमेश राजूरकर यांनी २७ जानेवारीला शेतकऱ्यांच्या समस्याचे निवेदन तहसिलदार वरोरा यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले होते. निवेदनात दिलेल्या मागण्याची पूर्तता न झाल्यास ३१ जानेवारीला तहसील कार्यालय वरोरा येथे शेतकऱ्यांचा भव्य विराट मोर्चा काढल्या जाणार असल्याचे लेखी निवेदनातून करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात कापूस, सोयाबीन पीकावरील आयात थांबवून निर्यातीबाबत निर्णय घेणे ज्या शेतकन्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांत पूर्ण रक्कम देण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली.
    आजच्या आंदोलन मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या भव्य मोर्चा चे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रमेशजी राजूरकर व किशोर डूकरे, टेमुर्डा यांनी केले असून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सामाजीक कार्यकर्ते सहभागी होते. त्यात
    डॉ. विजयराव देवतळे, जयंत टेमुर्डे, विजयराव मोकाशी,राजू पाटील लडके, बाळुभाऊ भोयर, विशालराव पारखी, अविनाश ढेंगळे, सुरेंद्रजी देठे, प्रशांत बल्की, राजुभाऊ कुकडे, विनोदराव सोनटक्के, गुणवंतराव भोयर, राजुपाटील डाफ, राजुपाटील देवतळे, गणेशराव चवले, नंदलालजी टेमुर्डे, दिवाकरराव टोंगे, अमोलराव जिवतोडे, अमोलराव पाचभाई,मनोजराव काळे, विठ्ठलराव डोंगरे,लक्ष्मणराव ठेंगणे, तात्यापाटील चौधरी, भिमाजी वाटकर, विशालभाऊ देठे, मधुरकरराव चौधरी, गजानन बदकी, नरेंद्र दारुडे, महेंद्र गारघाटे, संजय ननावरे, . वासुदेव जांभुळे, . किशोर बुराण, . चंद्रास मोरे, . गुलाब दडमल, . आनंदराव पा. देवगडे, . अमृत धवने, . अंकुश चौधरी, . बालाजी देठे, रूपेशराव चौधरी, सुरेश कुत्तरमारे, नरेश ननावरे, ईश्वर हजारे, पांडुभाऊ पावडे, रामदास जांभुळे, बाबा घुगल, शेरखान पठाण, अमित बहादुरे, अमोल काटकर,संदीप झाडे,प्रकाश झाडे, प्रदीप आवारी, प्रदीप बल्की, दादाजी दडमल, उमेश टोंगे, मधुकर उरकांदे, संदीप वासेकर, मिलींद भोयर, निळकंठ झाडे, अशोक कातकडे, राजेश्वर पाटील लेडांगे, आत्मारामजी खारकर, अशोकराव खंगार, दिलीप मत्ते, दिलीप डहाले, पांडुरंगजी गौरकार, पुष्पाकर खेवले, महेश वराटकर, पांडुरंगजी दातारकर, कमलाकर दारुडे, अशोक भोंग, विनोद कचाटे, राजु पिंपळकर, गोविंदा पाकमोडे, संदिप सोमलकर, भगवान चंदनबटवे, भगवान वाटवरवे तसेच भव्य संख्येने शेतकरी उपस्थित होते.