भद्रावती शहरात शिवसंवाद अभियान आज २८ ला

97

भद्रावती :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद अभियान सुरू आहे. सदर अभियान पूर्व विदर्भात पोहोचले आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भद्रावती शहरात माननीय शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब, युवासेना कार्यकारी सदस्य हर्षलजी काकडे, युवासेना विस्तारक शरद कोळी, युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर शिवसंवाद अभियान कार्यक्रम पार पडत आहे.

यामधे पूर्व विदर्भ संघटक श्री. सुरेशजी साखरे साहेब, पूर्व विदर्भ संघटिका प्रवक्त्या सौ. शिल्पाताई बोडके तसेच शिवसेनेचे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख अजय भाऊ स्वामी, राष्ट्रीय भोई महासंघाचे अध्यक्ष एडवोकेट अमोल बावणे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, जिल्हा युवा सेना मनीष जेठानी, उपजिल्हाप्रमुख भास्कर पाटील ताजने, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, तथा पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

या शिवसंवाद अभियानात वरोरा, भद्रावती व जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक तथा नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी केलेले आहे.