शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापिही माफ करणार नाही.

89

भद्रावती = शिवसेना संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसांच्या अस्मीततेसाठी शिवसेना स्थापन केली. अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आदर्श समोर ठेवीत

शिवसेनेनी महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कित्येकांना मोठे केले. परंतु त्यापैकी काहींनी शिवसेना फोडण्याचे पाप केले. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला दगाफटका दिला. महाराष्ट्रातील जनतेनी त्यांचे राजकीय अस्तीत्व धुळीस मिळाविले. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्य सुरळीत सुरु असतांना अलीकडेच अत्यंत बेजबादारपणे षडयंत्र रचून लालसेपोटी शिवसेना फोडण्याचे कटकारस्थान करण्यात आले. हा प्रकार जनता बघीत आहे.शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापिही माफ करणार नाही . असे प्रतिपादन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दि. २८ फेब्रुवारी रोजी स्थानिक श्रीमंगल कार्यालयात आयोजित़ शिव संवाद कार्यक्रमात केले.
याप्रसंगी व्यासपिठावर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे , युवासेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, युवासेना विस्तारक शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार,जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, पूर्व विदर्भ संघटिका प्रवक्त्या शिल्पा बोडके ,शिवसेनेचे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख अजय स्वामी, कार्यक्रमाचे आयोजक वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर ,अँड. अमोल बावणे ,उपजिल्हाप्रमुख भास्कर पाटील ताजने, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर ड्रकरे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर व खेमराज कुरेकर प्रामुख्याने हजर होते.
प्रमुख पाहूण्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन करतांना पुढे म्हटले की, देशांत महागाई, बेरोजगारी ,कृषीविषयक असंख्य समस्यांनी जनता त्रस्त आहे. परंतु शासनाचे याकडे लक्ष नाही. सर्वसामान्याचे कर्ज परतफेड झाले नाही, तर त्यांच्यावर जप्ती आणतात परंतु मोठयांचे व उद्योजकांचे कर्ज मात्र माफ केल्या जाते. विरोध करणाऱ्याला त्रास दिल्या जात आहे. यापूर्वी अस राजकारण पाहीलेल नाही. लहान लहान पक्ष संपविण्याची भाषा अत्यंत बेजबाबदारपणे केल्या जात आहे. असेही माजी खासदार यांनी या प्रसंगी म्हटले.
चंद्रकांत खैरे यांनी कार्यक्रमाचे आयोजक वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी कोरोना संक्रमण काळात केलेल्या सार्वजनिक सेवा कार्याची प्रशंसा केली. कोरोना संक्रमन काळात उपचार सुविधा सेंटर सुरू करतांना आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविंद्र शिंदे यांना कसे सहकार्य केले. या विषयीची माहिती सुध्दा या प्रसंगी सांगितली. चंद्रकांत खैरे यांनी रविंद्र शिंदे यांना आपले सेवा कार्य जोमाने सुरू ठेवण्याचा सल्ला सुध्दा दिला.
याप्रसंगी रविंद्र शिंदे यांनी त्यांच्या मार्फत शिवसैनिकांच्या सहकार्याने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले सामाजिक कार्य करतांना अंशी टक्के समाजकार्य व वीस टक्के राजकारण या तत्वानुसार अविरत सेवा करून आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान सभा आणि लोकसभेत आपण निश्चितपणे यश संपादित करु असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नर्मदा बोरीकर, अजय स्वामी आणि शरद कोळी यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सर्व सामान्य जनता व शिवसैनिक खंबीरपणे उभा राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या प्रसंगी तालुक्यातील सरपंच , उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खेमराज कुरेकर व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर डुकरे यांनी केले. या प्रसंगी फार मोठया संख्येत बंधूभगिनी उपस्थित होते.