समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र ( मावीम )अंतर्गत 20 गावात संयुक्त मालकी हक्क अभियान मोहीम संपन्न

57

भद्रावती :-

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावती नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत भद्रावती तालुक्यातील 20 गावात सयुक्त मालकी हक्क अभियान पथनाट्य जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आले. समाजात स्त्रियांना समानतेची वागणुक मिळावी व महिलांना माणूस म्हणून जगताना समान अधिकार मिळावा या दृष्टीने प्रामुख्याने मांगली , आष्टी, चोरा, गुळागव, वायागव, कोकेवाडा, वीलोडा, कातावल तु, मानोरा, शेगांव, थोराना, मनगाव, राळेगाव, पाटाला, माजरी, नागलोन, पळस गाव, कुचाना, कोंढ, या विस गावात सावित्री बाई फुले कला संच गोंडपिपरी याच्या कला कौशल्य चे माध्यमातून दि. 16 जुन 2023 ते 20 जुन 2023 या कालावधीत घेण्यात आले. सदर कार्यक्रमा करिता समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावतीच्या अध्यक्षा मा. सौ आशाताई प्रफुल ताजने, सचिव मा सौ निशताई प्रफुल गुलगुंडे समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावतीच्या व्यवस्थापक दक्षिणा बी.हुमणे , शालिनी पी रायपुरे उपजीविका समन्वयक , शालिनी डी दुर्योधन GIB लेखापाल रजनी रामटेके ,उपजीविका सल्लागार सपना कचाटे तसेच कार्यालयीन CRP , सर्व मिळून कार्यक्रमाचे नियोजन केले.गाव प्रतिनिधी ,माविम मित्र मंडळ ,ग्रामसंस्था पदाधिकारी यांनी गावांतील कार्यक्रम यशस्वी होने करिता व सर्व गावकऱ्यांना कार्यक्रमातील संदेश पोहचविणे करिता महत्वाची कामगिरी बजावली . व सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.