शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

135

शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार तथा श्री किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सूचनेनुसार श्री नितीन भाऊ मत्ते यांचे नेतृत्वात तथा सौ योगिताताई लांडगे यांचे मुख्य उपस्थितीत श्री आशिष ठेंगणे शहर प्रमुख भद्रावती यांचे विशेष पुढाकाराने भद्रावती शहरामध्ये पक्षप्रवेश सोहळा व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली . श्री कमलाकांजी कळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य चेक बराच ग्रामपंचायत व त्यांच्या समर्थक सदस्यांनी आज श्री नितीन मते यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना श्री नितीन मते यांनी शिवसेना सदस्य नोंदणी व शिवसेना पक्षाचे विशेष महत्त्व पटवून दिले तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याचे महत्व कार्यकर्त्यांना पटवून दिले व एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी भद्रावती शहरांमध्ये प्रत्येक वार्डात शिवसेनेची शाखा उघडण्याची सूचना शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांना व उपस्थित सदस्यांना केली . तसेच श्रीआशिष ठेंगणे यांनी यावेळी बोलताना म्हणाले भद्रावती शहरामध्ये येणाऱ्या काही दिवसात अनेकांचे पक्षप्रवेश व प्रत्येक वार्डात शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्याचा विश्वास श्री नितीन भाऊ मत्ते यांना दिला व संपूर्ण ताकदीने शिवसेना सदस्य अभियान भद्रावती शहरामध्ये राबवण्यात येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी श्री नितीन मते यांना दिला यावेळी अनेक वार्डातील मुख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला त्यामध्ये श्री कमलाकांजी कळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य चेकबरान ग्रामपंचायत, श्री नरेंद्र येवले विजासन, सौ करुणा संजय मोघे गुरुनगर, प्रमोद कुमरे बाजारवार्ड, राजेश नागपुरे झिंगुजी वार्ड, श्री संतोष बोमीडवार गौराळा वार्ड यांनी पक्षप्रवेश घेतला यावेळी ज्योतीताई लांडगे तालुकाप्रमुख महिला आघाडी, उषाताई आमटे चेतन घोरपडे हे उपस्थित होते