चिचोली येथे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते वं. राष्ट्रसंत तुकाडोजी महाराज पुतळा प्राणप्रतिष्ठा संपन्न

36

भद्रावती :
तालुक्यातील चिचोंली या गावांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट व्दारा राष्ट्रसंताची मुर्ती भेट देण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रस्टचे संस्थापक तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते रष्ट्रसंताच्या मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आले.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त तालुक्यातील चिचोंली गावात दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्रामसफाई, सामुहिक ध्यान व ग्रामगीता वाचन, घटस्थापना, महिला मंडळव्दारा हळदी-कुंकु कार्यक्रम, नामांकीत महाराजाचे किर्तन, भजन तसेच गोपाळ काल्याचे किर्तन करीत राष्टवंदना आरती करीत महाप्रसादाने कार्यक्रमाची आज (दि. 5) भक्तीभावाने सांगता करण्यात आली.
पुण्यतीथी महोत्सवाचे आज मुख्य आर्कषण होते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळयाचे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम. राष्ट्रसंताच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा चिचोली गावातील मुख्य चौकात विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते विधीवत पुजा अर्चनेस करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, भद्रावती कृउबास सभापती तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल, भद्रावती येवासेना अधिकारी राहुल मालेकर, मुधोली सरपंच बंडुजी नन्नावरे, पोलीस पाटील प्रणाली गेडाम, राष्टसंताच्या विचाराचे प्रचारक बाळासाहेब पडवे, गोपाल काल्याचे किर्तनकार वडेगाव कोरपना येथील ह.भ.प. डाखरे महाराज, भद्रावती कृउबास संचालक गजानन उताने, अरुन घुगुल, विलास जिवतोडे, अशोक टिपले, सिंधु पेटकर, हरीभाऊ टोंग, गुरुदेव सेवा मंडळ चिचोली पदाधिकारी कार्यकर्ते, गणमान्य प्रतिष्ठीत ग्रामस्त तथा चिचोली ग्रामवासी उपस्थित होते.
गुरुदेव सेवा मंडळ चिचोली यांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यतिथी महोत्सव सोहळयानिमित्त ग्राम पंचायत पटांगण चिचोली येथे आयोजित राष्ट्रसंताच्या विचारांच्या उपस्थित मानयवरांकडून मार्गदर्शनाचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य केले. गुरुदेव सेवा मंडळ चिचोली यांनी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना, राष्टसंतांची आरती करीत महाप्रसादाने केली तसेच मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करुन एक नविन दिशा देण्याचे कार्य केल्याबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त केले. मोठया संख्येन उपस्थित ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला