कुचना परिसरातील कार्यकर्त्यांचा माजी गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

42

भद्रावती :-

देशाचे गौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या विकास कार्याला प्रेरीत होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे.. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भद्रावती तालुक्यातील कुचना या गावच्या सरपंच सौ सुचिता ताई ताजने व स्वप्नील बेले सोबत इतर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रिय अध्यक्ष मागास वर्गीय आयोग भारत सरकार श्री हंसराज जी अहिर तसेच 75 वरोरा भद्रावती विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. श्री रमेश जी राजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. त्याचप्रमाणें माजरी येथील सरपंच सौ छायाताई जंगम यांचा काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यांचा आज मा. हंसराज अहिर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी माजरी येथील ग्रामपंचायत सदस्य हँडसम राव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर , एम.पी.राव, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश जी उपाध्याय, राकेश जी तल्लरवार , बाबुराव केवट, संदीप केवट, अजय सिंग, बुद्ध राज केवट, अजित सिंग , विकासजी तिवारी, 75 वरोरा विधानसभेचे विस्तारक गंगाधर कुंटेवार, बाळू भाऊ पाचबाई , प्रशांतजी डाकरे, गंगाधर जी कारेकर इत्यादी उपस्थित होते.