डॉ. अशोक जीवतोडे : बहुजन नेतृत्व

10

*डॉ. अशोक जीवतोडे व त्यांचा परिवार सातत्याने बहुजन समाजाला घेवून कार्य करीत आहे. हा परीवार बहुजन समाजाच्या उत्थानाकरीता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व ओबीसी चळवळीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. काम करण्याची सचोटी, सातत्य व प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे. म्हणून इतक्या दशकापासून अविरतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. बहुजन समाजाला या परिवाराच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. शिक्षण व सामाजिक चळवळ हा त्यातील केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे त्यांना बहुजन नेतृत्व म्हणून संबोधता येईल.*

*शिक्षण, सामाजिक व चळवळीच्या क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात त्यांची उपस्थिती दखलपात्र राहिली आहे. राजकीय क्षेत्रातून संवैधानिक पदावर जाता आले तर बहुजनांचे कार्य करणे सोपे जाईल, अधिक ताकदीने पूर्व विदर्भात बहुजनांकरीता संधी उपलब्ध करून देता येईल, असे त्यांना सतत वाटते.*

*शैक्षणिक चळवळ, ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ, या चळवळीतील त्यांची सक्रियता त्यांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष देते.*

*असे बहुजन नेतृत्व समाजात मोठे व्हावे व त्यांच्या हातून जनकल्याण व्हावे, अशी या वाढदिवशी सदिच्छा आहे.*
————————————–

पश्चिम महाराष्ट्रातील कर्मवीर भाऊराव पाटील, पश्चिम विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या खालोखाल शैक्षणिक क्षेत्रात पूर्व विदर्भात माजी आमदार श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी शैक्षणिक कार्यात भरीव काम केले व या परिसरातील घराघरात शिक्षण पोहोचविले. त्या कुटुंबात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा जन्म झाला. एम. कॉम., एम. ए. (अर्थशास्त्र), एम. फिल., एम. एड., पी.एच. डी. (शिक्षण व वाणिज्य) असे शिक्षण घेवून शिक्षकी पेशात पदार्पण करून १९९२ पासून तर आजतागायत ते पूर्व विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सेक्रेटरी म्हणून यशस्वीरीत्या कार्यरत आहे. सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना सामाजिक जवाबदारीचे भान ठेवून त्यांनी कुणबी, शेतकरी समाजाला एकत्र करण्याचे काम जानेवारी २००८ मध्ये केले व समाजकारणाला मोठ्या हिरहिरीने सुरुवात केली. व हे कार्य समाजाची व जनतेची स्व. श्रीहरी जीवतोडे यांच्यावर असलेली श्रध्दा व निष्ठा यामुळे डॉ. अशोक जीवतोडे हे करू शकले. त्यानंतर वडीलांप्रमानेच विदर्भ राज्याचा ध्यास घेवून एड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य वेगळे व्हावे व विदर्भ राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जनजागृती व व्याख्याने आयोजित करण्यात आले व या कार्यात लोकांचा सहभाग वाढला. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे आंदोलन उभे केले. या राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी समाजाच्या कार्यात कधी सन्मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, सन्मा. श्री. हंसराजजी अहिर, सन्मा. श्री. शरदजी यादव, सन्मा. श्री. बंडारू दत्तात्रय, सन्मा. श्री. तेजस्वी यादव, सन्मा. श्री. इंद्रजित सिंग, सन्मा. श्री. हुकूम देव नारायण सिंह व देश पातळीवरील अनेक राजकीय तथा सामाजिक नेत्यांसोबत सहभाग नोंदविला. ओबीसी समाज जागृती साठी पूर्व विदर्भातील २७ तालुक्यात जनजागृती सभा घेवून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर विधानसभेवर लाखो लोकांचा धडकलेला मोर्चा हे त्याचे फलित होय. पदवीधर मतदान नोंदणीत नागपूर जिल्हा खालोखाल २० हजार पेक्षा जास्त पदवीधर नोंदणी चंद्रपूर जिल्ह्यात केल्यामुळे त्यावेळी सन्मा. श्री. नितीनजी गडकरी हे त्यावेळी पदवीधर मतदार संघात २००८ ला व २०१४ मध्ये श्री. अनिल जी सोले निवडून आले. शैक्षणिक क्षेत्रात पूर्व विदर्भात डॉ. अशोक जीवतोडे यांचा दबदबा असल्याने शिक्षक मतदार संघात सुध्दा त्यांचे सहकार्य राहिल्याने त्यावेळी श्री. नागोजी गाणार २०१० व २०१६ ला निवडून आले. त्यानंतर त्यांनी ज्यांना ज्याना पाठिंबा घोषित केला ते सर्व निवडून आले, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अजात शत्रू म्हणून विदर्भातील सुपरिचित असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अशोक जीवतोडे होय. भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारांना मदत करून निवडून आणण्याचे प्रयत्न डॉ जीवतोडे यांनी केले. २०१९ मधे खूप कमी मतांनी बीजेपी चे मा. हंसराज अहिर हे पराजित झाले, त्यांच्यासोबत डॉ. अशोक जीवतोडे हेच होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकरीता पक्षाने जवाबदारी दिल्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ओबीसी चळवळीत व भारतीय जनता पक्षात चांगले कार्य करुनही त्यांना राजकीय संधी मिळाली नाही. मात्र ते काम करीत राहिले.

समाजकारण, शैक्षणिक व राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचें बंधू स्व. संजय यांना अपक्ष जिल्हा परीषद निवडणुकीत निवडून आणले, व भद्रावती वरोरा विधानसभेत देखील चांगले मतदान २००४ मध्ये स्व.संजय ला मिळाले. स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी हे स्वतः अपक्ष आमदार म्हणून १९६७ मध्ये राजुरा विधान सभेत निवडून गेले होते.

धनोजे कुणबी शेतकरी समाज एकत्रीकरण, विदर्भ विकासाचा ध्यास घेवून विविध कार्यक्रम तथा आंदोलन आयोजित करून जनतेला विदर्भ विकासाचे महत्व पटवून देणे, ओबीसी समाजाला एकत्र आणण्याची मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करून ओबीसींच्या संविधानिक मागण्यांसाठी लढा उभा केला व आता पर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून २४ मागण्यांची पूर्तता करून शासन निर्णय काढून घेतले, हे ओबीसी चळवळीचे यश आहे.

डॉ. अशोक जीवतोडे हे आपले वडील स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना राजकीय गुरु मानतात. उच्च शिक्षण, दांडगा जनसंपर्क, निवडणुकीचा अनुभव, अजात शत्रू व सुपरिचित हसतमुख उमदे व्यक्तीमत्व, लोकांना सहज उपलब्ध होणारे तथा लोकांची कामे सहज करणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. अशोक जीवतोडे यांचा सुपरीचय आहे. पूर्व विदर्भात विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्र व राजकीय कार्यक्रमात उपस्थित राहत असल्याने पूर्व विदर्भात डॉ. अशोक जीवतोडे यांचा संपर्क दांडगा आहे.

सोशल मीडियावर डॉ. अशोक जीवतोडे हे सातत्याने सक्रिय असतात. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर त्यांच्या कार्याचे वृत्त तथा त्यांचे कार्यक्रम दिवसभर नियमितपने दिसून येत असतात.

राजकीय क्षेत्राबाबत डॉ. अशोक जीवतोडे यांचे विचार स्पष्ट आहेत. प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच असते, हे ध्यानात ठेवून तन मन धनाने कार्य करीत राहिले पाहिजे. समाजाची अविरत सेवा करीत राहिले पाहिजे. तथा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जनतेची कामे केलीच पाहिजे. पक्ष व कार्यकर्त्यांना मोठे केले म्हणजे नेता आपोआप मोठा होतो, असे त्यांना वाटते.

शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने जवळ जवळ सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याने राजकीय क्षेत्रात देखील ते अजात शत्रू म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यात नकारात्मक असे काहीच दिसून येत नाहीच.

चंद्रपूर, वणी, आर्णी हे लोकसभा क्षेत्र बहुजन बहुल असल्याने लोकसभा २०२४ चा प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा उमेदवार हा याच बहुजन समाजाचा असावा अन्यथा राजकीय पक्षाला दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून आणणे कठीण जाईल, असे डॉ. अशोक जीवतोडे समजतात.

शब्दांकन
प्रा. रविकांत वरारकर,
भद्रावती
9975212721