निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मिलेट या एकदिवसिय राष्ट्रीय परिषद .

81

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मिलेट या एकदिवसिय राष्ट्रीय परिषद .

भद्रावती – स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आय क्यू एस सी च्या संयुक्त विद्यमाने भरड धान्य ( मिलेट ) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले

या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती , उद्घाटक डॉ दिनेश कनवडे, मिलेट ब्रिडर , डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला , प्रमुख पाहुणे डॉ रुपेश बडेरे , प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर , श्री बंडू धोतरे , संस्थापक अध्यक्ष इको प्रो चंद्रपूर व कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य डॉ एल एस लडके उपस्थित होते

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले तसेच याप्रसंगी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

सर्वप्रथम या उद्घाटनिय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी केले त्यात त्यांनी महाविद्यालयात होत असलेल्या एक दिवसीय मिलेट परिषदेच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट करीत संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य मिलेट वर्ष म्हणून घोषित केले असून जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे त्यावरची कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे व मिलेटचा प्रचार व प्रसार अशा प्रकारचा राष्ट्रीय परिषदेतून होतो असे आपल्या प्रास्ताविकेतून स्पष्ट केले

याप्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांच्या हस्ते डॉ दिनेश कनवडे , डॉ रुपेश बडेरे, श्री बंडु धोतरे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ दिनेश कनवडे यांनी मिलेट चे महत्व विशद करताना मीलेट हे आरोग्यदायी दमा प्रतिबंधित करणे खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे त्वचा निरोगी ठेवणे तसेच मिलेट हे सर्व आजारावर रामबाण उपाय असल्याचे आपल्या उद्घाटनिय भाषणात स्पष्ट केले

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्नप्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य असून भरड शेती जैवविविधतेचे रक्षण करते तसेच भरड धान्यात औषधी गुणसत्वे असून त्याचा उपयोग सर्वांनी रोजच्या आहारात केला पाहिजे तसेच मिलेट युक्त आहार व नियमित व्यायाम हा रोजच्या सवयीचा भाग करावा त्यामुळे आपले जीवन निरोगी राहण्यास मदत होते व आपण आजार मुक्त होतो तसेच अशा प्रकारच्या राष्ट्रीय परिषदेमुळे मिलेटची सर्वांना माहिती होऊन त्याचा प्रचार व प्रसार होऊन मिलेट वापरण्याचे क्रांती व्हावी असे उपस्थित त्यांना मार्गदर्शन करीत या राष्ट्रीय मिलेट परिषदेला शुभेच्छा दिल्या

त्यानंतर मीलेट वर चार तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले त्यात डॉ दिनेश कनवडे यांचे मिलेट चे महत्व त्याचा वापर व लागवड या विषयावर , डॉ रुपेश बडेरे यांचे मिलेटच्या वाढीचे शास्त्रीय कारणे , श्री बंडू धोतरे यांचे मिलेटचे आरोग्यदायी फायदे या विषयावर तसेच डाॅ प्रिया शिंदे यांचे आपल्या जीवनात आहार व रोग या विषयावर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते

या भरड धान्य( मिलेट) राष्ट्रीय परीषदेत मध्यान्य जेवनात मिलेट वर आधारित भाकर, कण्या , बाजरीची खिचडी, आंबिल , या प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते

या मिलेट राष्ट्रीय परिषदे करता गोंडवाना विद्यापीठ , रातुम नागपूर विद्यापीठ , संत गाडगेबाबा विद्यापीठ तसेच विविध राज्याच्या वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक , संशोधक विद्यार्थी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते

या उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रवीणकुमार नासरे तर आभार प्रदर्शन डाॅ एन एस वाढवे यांनी केले

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉ कार्तिक शिंदे , डॉ विशाल शिंदे , डॉ अपर्णा धोटे , डॉ नरेंद्र हरणे , डॉ अजय दहेगावकर , डॉ राजेश हजारे डाॅ गजेंद्र बेदरे , प्रा संदीप प्रधान , डॉ एम एल खादरी , डॉ शशिकांत शित्रे , डॉ किरण जूमडे , प्रा सचिन श्रीरामे, प्रा कुलदीप भोंगळे , श्री किशोर भोयर , श्री अजय आसुटकर , सौ सुकेशीनी भवसागर , श्री विशाल गोरकर , श्री रविंद्र गोटेकोडे , श्री शरद भावरकर , श्री प्रमोद तेलंग , श्री खुशाल मानकर , श्री पांडुरंग आखतकर यांनी अथक परिश्रम घेत