आयुध निर्मानींचे खाजगीकरण, देशाच्या सुरक्षेस मोठा धोखा.

96

आयुध निर्मानींचे खाजगीकरण देशाच्या सुरक्षेस मोठा धोखा

आंदोलन उभारू भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव मुकेश सिंग यांचा पत्रपरिषदेत इशारा.

#OrdinanceFactory #Ayudhnirmani #Bhartiyamajdursangh #BMS #Oldpenshionscheme

चंद्रपूर : आयुध निर्मानीच्या खासगीकरनास आमचा विरोध आहे.केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय देशाच्या सरक्षणासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आपण पारतंत्र्यात जाऊ शकतो.निर्मानीच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र शासनाने तात्काळ वापस घ्यावा असे भारतीय मजदुर युनियनचे राष्ट्रीय सचिव मुकेश सिंग यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
ते आयुध निर्मानी चांदा येथे दि.२८ आणि २९ जानेवारीला पार पडलेल्या भारतीय मजदुर युनियनच्या भारतीय प्रतिरक्षा मजदुर संघाच्या पदाधिकारी अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून आले होते.हे अधिवेशन आयुध निर्मानी वसाहतीतील कॅम्युनिटी हॉल मध्ये पार पडले.
केंद्र शासनाच्या या निर्णयविरोधात तेव्हाच आम्ही भूमिका आखली होती परंतु डोकलाम परिस्थितीमुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले.आधी देश नंतर हक्क हा आमचा नारा आहे असे ते म्हणाले.केंद्र शासनाचे सल्लागार योग्य सल्ला न देता भांडवलदारांच्या हिताचा सल्ला केंद्र शासनाला देत असतात असा आरोपही त्यांनी केला.आयुध निर्मानीत तयार झालेले आयुध हे खुल्या बाजारात विकता येत नाही.ते केंद्र शासनाच्या मध्यस्थीनेच विकावे लागते. खासगीकरणामुळे उत्पादनात वाढ झाली असे नाही.ज्या सवलती केंद्रशासन खासगी कंपन्यांना देते ते आम्हास द्यावे.आम्ही त्यांच्यापेक्षा दर्जेदार आणि दिलेल्या लक्षापेक्षाही अधिक काम करू असे मुकेश सिंग यांनी सांगितले .भारत दूरसंचार निगमचे खासगीकरणाने जे झाले तेच आयुध निर्मानीचे होईल.गेल्या २०० वर्षांपासूनचा इतिहास डावलून हे खासगीकरण करण्यात आले ते फार काळ टिकणार नाही असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासगीकरणाच्या विरोधासह कर्मचाऱ्यांच्या हिताचा रक्षणाच्या संदर्भातही भारतीय मजदुर संघ यापुढे निकराईने लढा देईल असे सिंग यांनी शेवटी सांगितले.
पत्रपरिषदेत भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशकुमार ,उपाध्यक्ष विद्यासागर,मारोती पवार,बी.श्रीनिवास, संयुक्त सचिव हेमंतकुमार,संघटनमंत्री के. यु.स्वामी,पर्यावरण मंत्री रंगधडे,संरक्षण मंत्री बाटवे,सीईसी मेंबर सदानंद गुप्ता,ओ.एफ.चांदा मजदुर संघाचे अध्यक्ष चिनी बालप्पा ,सचिव सुशांत मिलमिले,मनीष मत्ते,राजेश बिसेन,रुपेश पाठक यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.