मुरूम तस्कर जोमात, प्रशासन कोमात

129

मुरूम तस्कर जोमात, प्रशासन कोमात*

*हजारो ब्रास मुरूमची अवैध तस्करी,

प्रशासणाची मूक संमती

भद्रावती :

  • भद्रावती शहरालगत असलेल्या केसूर्ली व कुरुडा परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम साठा उपलब्ध आहे याचाच फायदा घेत अवैध व्यवसाईक या मुरूमची तस्करी करण्यात अहोरात्र जुंपलेले असतात.
    सध्या घर बांधकामाचे सीजन सुरु असल्यामुळे भरण भरण्याकरिता मुरुमाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्या करिता या परिसरातील हजारो ब्रास मुरूम अवैधरित्या जेसिबीने उत्खणन करून हायवा व ट्रॅक्टर च्या सहाय्याने बांधकाम स्थळापर्यंत पोहचविले जाते. हे सर्व होत असतांना महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग या तीनही विभागातील एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येत नाही हे विचार करण्याजोगे आहे.
    या तस्करांवर एकही विभाग कारवाही करत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. कुणाचीही भीती न बाळगता मिळेल तो मार्ग वापरून अगदी पहाटे पासून तर दिवसभर ही वाहतूक सुरु असते कसल्याही प्रकारची रॉयल्टी न भरल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुळत आहे. विशेष म्हणजे मुरुमाची वाहतूक शहराच्या मधून मुख्यमार्गाने हायवा द्वारे होत असतांना कुणीच कसे कारवाही करत नाही. ही बाब शंकास्पद आहे. या मुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची या सर्व प्रकाराला मूक संमती तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.