कोंडवाड्यात डांबून दलाला मार्फत कत्तलखाण्यात गुरांची तस्करी.राधाकृष्ण गोरक्षण समितीचा आरोप.

92

भद्रावती :

विना चारापाणी मुक्या जनावरांना नगरपरिषदेद्वारा कोंडवाड्यात डांबले व दलाला मार्फत जनावरांचा लिलाव करुन कत्तलखाण्यात पाठविल्या जात असल्याची तक्रार राधाकृष्ण गोरक्षण समितीने ठाणेदारांकडे केली आहे.

लंपी आजारामुळे मागील आठ महिन्यापासून येथील जनावरांचा कोंडवाडा बंद होता. तो १४ मार्च २०२३ पासून जाहीरात न करता सुरु झाला १४ मार्च २०२३ ला रात्रौ १.३० ते २०० वाजता अंधारात रस्त्यावर असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या अंगणातील गाई जनावरे १५ ते १६ व्यक्तींनी हाकलत कोंडवाडयात जमा केल्या. चार दिवसापासून त्या मुक्या जनावरांना चारा पाणी दिल्या गेले नाही. त्यामुळे मुक्या जनावरांची ही हालअपेष्ठा पाहून शेतकऱ्याच्या आणि गोभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांच्या अंगणातील जनावरे बेकायदेशीर रीत्या कोंडवाडयात कोंडून दलाला मार्फत त्यांचा लिलाव करुन त्या जनावरांना कत्तलखाण्यात पाठविल्या जात आहे. या सर्व गैरप्रकाराची चौकशी करून त्यावर प्रतिबंध घालावा, असे तक्रारीत नमूद आहे.

संबंधीत ठेकेदारास गुरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले असून, गुरांवर आलेल्या लंपी आजारामुळे गुरे कोंडवाड्यात टाकण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. परंतु आता ती बंदी उठवीण्यात आली आहे.रहदारीस अडथडा होत असलेली जनावरेच कोंडवाड्यात टाकण्याचे आदेश संबंधीत कंत्राटदारास देण्यात आले आहेत. गुरांना चारा व पाणी वेळेवर देण्यात येत असल्याची मी स्वतः खात्री केलेली आहे.कोंडवाडा सुरु झाल्याची माहिती नागरीकांना नसल्यामुळे संबंधीत मालकांना बोलावून त्यांची गुरे त्यांना परत करयाचे आदेश देण्यात आलेले आहेत.
……मा.मुख्याधिकारी

नगर परिषद,भद्रावती.

सदर निवेदन देतांना राधाकृष्ण गौरक्षक समिती, भद्रावती चे उपाध्यक्ष श्री सुदर्शन तनगुलवार,सचिव श्री चेतन शेंडे,सहसचिव श्री सुभाष साळवे,कोषाध्यक्ष श्री मंगेश नामोजवार व इतर मान्यवर श्री धनराज आस्वले, श्री सुरेश परसावार, श्री बंडू भास्करवार, श्री हेमंत शेटे, श्री अनंत मते, श्री सचिन ताजने, श्री रवी यादव, श्री प्रकाश पामपट्टीवार, सौ कविता सुपी, सौ सुनीता खंडाळकर तथा सौ तृप्ती हिरादेवे उपस्तित होते.