पाठ्यपुस्तक व नोटबुक प्राप्त करून शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

6

भद्रावती :

सध्या शाळेच्या नविन सत्राला सुरुवात झाली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तक व नोटबुक घेण्याची लगबग सुरू आहे. पाठ्यपुस्तक व नोटबुक च्या वाढत्या किमती बघता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व नोटबुक खरेदी करणे महाग पडते. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेतून पाठ्यपुस्तक, नोटबुक निःशुल्क मिळाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद उमटतो. हा आनंद निर्माण केला आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भद्रावती तालुका अध्यक्ष राकेश खुसपुरे यांनी.

सामाजिक कार्यकर्ते राकेश खुसपुरे यांच्यावतीने स्थानिक किल्ला वार्ड येथे नुकताच शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, नोटबुक वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांशी हितगुज साधून, त्यांना बोलते केले. सुनियोजित अभ्यास करून यथोचित यश गाठण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच समाधान व आनंद निर्माण झाला होता.

यावेळी राकेश खुसपुरे, वामनराव नामपल्लिवार, पुरुषोत्तम मत्ते, भदुजी वैद्य, नथूजी रासेकर, प्रशांत मत्ते, विनोद भाऊ रासेकर, अनिरुध्द मत्ते, आतिश दुर्गे, संदीप मालू, दिनेश बोधाने, पंकज चिकटे, प्रदीप खंगार, आकाश खुसपुरे, साधना भोयर, प्रीती मत्ते, वनिता मत्ते, भुजा मोजे, संगीता जद्दलवार, केलझरकर, राखी खुसपुरे, हर्षाली बोधाणे, लक्ष्मी आत्राम, पौर्णिमा बाडगुरे, निकिता राऊत, सरस्वती बांदुरकर आदी उपस्थित होते.