माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

41

भद्रावती :

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज (दि.२७) ला विविध सामाजिक उपक्रम तथा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या तर्फे साजरा करण्यात आला.

संततधार पावसाळ्याच्या निमित्ताने विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

ग्रामीण भागात उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भास्कर ताजने यांनी ग्रामीण परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना पेपर क्लिपबोर्डचे वाटप केले. सोबतच तालुक्यातील निंबाळा येथील निवासी प्रेरणा अंध विद्यालय येथे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

यावेळी घोडपेठ येथील केंद्रप्रमुख तुमराम सर, मुख्याध्यापिका उरकूडे, वडेट्टीवार, रघाताटे, कु. भाग्यश्री केराम, सुजाताताई खडके, तथा पक्षाचे पदाधिकारी परमेश्वर ताजने, संचालक विनोद घुघुल, प्रकाश देवतळे, मोडक, सुनील चौधरी, बाबू येसेकर, निंबाळा चे सरपंच देवेंद्र रामटेके, कैलास दूधकोहळे, विनोद येसेकर, भाऊराव वनकर, राजुभाऊ बोडे, प्रविण ताजने, रविभाऊ मानुसमारे, मदन शेरकी, संजय सुर, देवा चापले, राजुभाऊ भोंगळे, पांडुरंग फटाले, प्रकाश पिंपळकर, निशांत मेश्राम, संतोष ईखारे, राजू कुमरगुड्डावार, दिलीप खापनवाडे, राहुल साव, अंध विद्यालयाचे प्रा. भोयर, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.