भद्रावती : ग्राहक पंचायत, भद्रावती ने जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधुन दि.१५ मार्च २०२३ ला सकाळी १०:३० वाजता विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
ग्राहक पंचायत, भद्रावती ही प्रत्येक वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि जागतिक ग्राहक दिवस नवनविन सामाजिक उपक्रम राबवून साजरा करीत असते. यावर्षी सुद्धा रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या आपल्या देशातील तरूणांपुढे रोजगाराचे मोठे आवाहन आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराची निर्मिती कशी करता येईल आणि सुक्षिक्षीत तरूण, तरुणींना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल याकडे ग्राहक पंचायत, भद्रावतीने विशेष लक्ष देऊन येणाऱ्या १५ मार्चला रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात मार्गदर्शनासाठी जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपुर चे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, बँक ऑफ इंडिया, चंद्रपुर जिल्हा अग्रीम अधिकारी, प्रशांत धोंगडे, बँक ऑफ इंडिया चे शाखा प्रबंधक, भास्कर आदे, विजया इंडस्ट्रीज व पवन ऑटोमोबाईल चंद्रपूर चे धर्मेंद्र पाटील तसेच ग्राहक पंचायत, जिल्हा अध्यक्षा नंदिनी चुनारकर, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच शिबीराचा लाभ शहरातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांसोबत घेणार आहे. याशिबिरात उपस्थित राहण्यासाठी https://forms.gle/14xTMZLLBDeDLyFx9 या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी आपली माहीती भरावी.
या मार्गदर्शन शिबिरात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती, राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवसाय कर्ज आणि विविध योजनांची माहिती तसेच उद्योग निर्मिती आणि समस्या यावर सखोल आणि उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या रोजगार मार्गदर्शन शिबिराचे शहरातील तरूण, तरूणी आणि पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत आणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांचे कडून करण्यात येत आहे.