केपीसीएल खुल्या कोळसा खाणी संदर्भात पालकमंत्री विरोधात सोशल मीडियावर पोस्ट वायरल भद्रावती पोलिसात तक्रार दाखल

112

केपीसीएल खुल्या कोळसा खाणी संदर्भात पालकमंत्री विरोधात सोशल मीडियावर पोस्ट वायरल

भद्रावती पोलिसात तक्रार दाखल

भद्रावती: बरांज येथील कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन प्रणित बरांज कोल माईंस प्रा. लि.च्या खुल्या कोळसा खाणीकरिता प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी व गावे घेण्याऐवजी शासनाने कंपनीला मदत करून शेजारची वनजमीन दिल्याने प्रकल्पग्रस्तात उद्रेक निर्माण झाला.त्याची परिणीती पालकमंत्री यांच्या विरोधात एक पोस्ट वायरल करण्यात आली.पोस्ट वायरल करनाऱ्याच्या विरोधात भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.या घटनेमुळे प्रकल्पग्रस्तात तीव्र असंतोष पसरला आहे.
महाविकास आघाडीचे शासन असतांना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने दि.१३ऑक्टोबर २०२१ रोजी खाणीलगतच्या मौजा चीचोर्डी येथे भव्य आंदोलन उभारून प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कांसाठी आपण सर्वोतोपरी मदत करू असे जाहीर आश्वासन दिले.त्यांच्या आश्वासनाने प्रकल्पग्रस्तात नवचैतन्य निर्माण झाले.कारण मुनगंटीवारांचे व्यक्तिमत्त्व ‘बोले तैसा चाले’ असे असल्याने सगळे आश्र्वस्थ होते.महाविकास आघाडीचे शासन जाऊन भाजप शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली आणि सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.त्यांना वने,सांस्कृतिक आणि मत्स्यविकास मंत्रालय ही खाती मिळाली.ना.मुनगंटीवार यांनी विरोधात असतांना प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द आता ते सत्तेत आल्याने पूर्ण करतील असे वाटू लागले.मात्र त्यांचेकडून प्रकल्पग्रस्तांचा भ्रमनिराश झाला.प्रकल्पाला लागून असलेली ८४.८१हे.आर.वन जमीन प्रकल्पाला मिळाली.आता आपली शेतजमीन आणि गावे कंपनी घेणार नाही.ही प्रकल्पग्रस्तांची पक्की धारणा झाली.१७ वर्षापासून आपल्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रकल्प ग्रस्तांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले.त्यातूनच दि.२६ जानेवारीला वैफल्यातून प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट वायरल केली.या पोस्टमुळे प्रचंड खळबळ माजली.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले स्थानिक कार्यकर्ते प्रवीण ठेंगणे आणि संजय ढाकणे यांना पोलिसात तक्रार करावयास सांगितले.तक्रार दाखल होताच पोलिसांनी पोस्ट वायरल करणाऱ्या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला.